शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ललित मोदींसाठी कधीच शिफारस केली नाही - सुषमा स्वराज

By admin | Updated: August 3, 2015 14:24 IST

ललित मोदींच्या ट्रॅव्हल डॉक्यूमेंटसाठी ब्रिटन सरकारला कधीही शिफारस केलेली नाही असा दावा करत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३ - ललित मोदींच्या ट्रॅव्हल डॉक्यूमेंटसाठी ब्रिटन सरकारला कधीही शिफारस केलेली नाही असा दावा करत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेस सादर करत असलेल्या पुराव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

सोमवारी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी सुरुवातीला नो वर्क नो पे या धोरणावरुन गदारोळ घातला. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी खासदारांसाठी नो वर्क नो पे हे धोरण सुरु करण्याचे विधान केले होते. यावरुन काही वेळ गोंधळ घातल्यावर विरोधकांनी ललित मोदी प्रकरणावरुन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या आरोपावर सुषमा स्वराज यांनी पहिल्यांदाच राज्यसभेत उत्तर दिले. स्वराज म्हणाल्या, माझ्यावरील आरोप निराधार आहेत, मी ललित मोदींना कधीही मदत केली नाही. मी आरोपांवर उत्तर देण्यासाठी दररोज संसदेत येते, पण विरोधक माझे उत्तर ऐकून घेण्याऐवजी फक्त गोंधळ घालत आहेत अशी टीका त्यांनी केली. सुषणा स्वराज उत्तर देत असताना विरोधकांनी राज्यसभा अध्यक्षांसमोर येऊन जोरदार  घोषणाबाजी केली. यामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.