शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच

By admin | Updated: June 1, 2017 01:15 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातामध्येच झाला होता, असे केंद्र सरकारने स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातामध्येच झाला होता, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या या उत्तरामुळे नेताजींच्या मृत्यूविषयीचे गूढ संपले आहे, असे अनेकांना वाटत असले तरी मात्र बोस कुटुंबियांनी त्यास आक्षेप घेतला आहे. कोणताही स्पष्ट पुरावा नसताना केंद्र नेताजींच्या मृत्यूचे कारण कसे काय जाहीर करू शकते?, असा सवाल सुभाषचंद्रांच्या भावाच्या नातवाने केला आहे.गुमनामी बाबा आणि भगवानजी या नावांचा न्या. मुखर्जी आयोगाच्या अहवालात उल्लेख आहे. मात्र बोस हेच त्या नावाने वावरत होते, हे खरे नसल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला होता, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नेताजींचा मृत्यू झालाच नव्हता आणि ते गायब झाल्यानंतर गुमनामी बाबा व भगवानजी या नावाने वावरत होते, असे मानणारा एक वर्ग आहे. नेताजींच्या भावाची नात माधुरी बोस यांनी मात्र नेताजी असे अन्य नावाने वावरत होते, ही शक्यता फेटाळून लावली आहे. गृह मंत्रालयानेही शाहनवाझ समिती, खोसला आयोग व मुखर्जी आयोग यांच्या अहवालाच्या आधारे त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी या संघटनेच्या सायक सेन यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे सुभाषचंद्र बोस यांच्यासंबंधीची काही माहिती विचारली होती. त्यांच्या अर्जाच्या उत्तरात गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मात्र सेन यांनी सरकारच्या माहितीमुळे आपणास धक्का बसल्याचे म्हटले आहे. नेताजींच्या मृत्यूचे कारण शोधण्यात यावे, यासाठी आम्ही झगडत आहोत, विमान अपघाताबाबत निश्चित पुरावा अद्याप सापडलेला नाही. असे असताना कशाच्या आधारे हे उत्तर सरकारने दिले, असा सवाल नेताजींच्या भावाचे नातू व बंगाल भाजपचे उपाध्यक्ष विमान बोस यांनीही केला आहे.मोदींनी दिले होते तपासाचे आश्वासनमी आधी नेताजींचा नातू आहे आणि मग भाजपचा उपाध्यक्ष, असे सांगून विमान बोस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या संबंधीच्या फायली उघड केल्या. त्यावेळी त्यांनी नेताजींविषयीचे गूढ दूर करण्यासाठी त्या प्रकरणाचा तपास करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता आणि ते चीन वा रशियाला गेले, असे मुखर्जी आयोगाच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले होते. मात्र तेव्हाच्या सरकारने तो निष्कर्ष फेटाळून लावला होता. नेताजी बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झालाच नव्हता, असे काही संशोधकांचेही म्हणणे आहे.