शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतीमुळे नेस वाडिया पुरते अडचणीत

By admin | Updated: June 25, 2014 14:05 IST

उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात आज अभिनेत्री प्रीती ङिांटाने वानखेडे स्टेडिअममध्ये मरिन ड्राइव्ह पोलिसांना पुरवणी जबाब दिला.

मुंबई  : उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात आज अभिनेत्री प्रीती ङिांटाने वानखेडे स्टेडिअममध्ये मरिन ड्राइव्ह पोलिसांना पुरवणी जबाब दिला. यात तिने एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह सुमारे चार ते पाच नव्या साक्षीदारांची नावे दिली. प्रीतीने 3क् मे रोजी स्टेडिअमच्या गरवारे स्टॅण्ड आणि मैदानात नेसकडून मिळालेल्या वागणुकीचा घटनाक्रम पोलिसांना समजावून सांगितला. तसेच आधीच्या तक्रारीतून पोलिसांना पडलेल्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरेही दिली. स्टेडिअममध्ये घडलेल्या या घडामोडीतून नेस इज अन ट्रबल(पुरते अडचणीत सापडल्याची प्रतिक्रिया तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिका:याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
3क् मे रोजी गरवारे स्टॅण्ड आणि मैदानात तीनदा नेस यांनी चारचौघांत अर्वाच्च शिव्या दिल्या, जोरजोरात ओरडले. त्यापैकी एका घटनेत त्यांनी हाताला धरून ओढण्याचा प्रय} केला, अशी तक्रार 12 जूनला प्रीतीने मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी नेस यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. मात्र त्यानंतर लागलीच लॉस एन्जेलीसला रवाना झालेल्या प्रीतीची तक्रार त्रोटक असल्याची जाणीव पोलिसांना झाली. त्यानुसार त्यांनी तिला पुरवणी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले होते. विवारी मुंबईत परतलेली प्रीती मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आलिशान लेक्सस गाडीतून वानखेडे स्टेडिअममध्ये पुरवणी जबाबासाठी आली. स्टेडिअममधील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. सुमारे दीड तास ही प्रक्रिया चालली. त्यानंतर गरवारे स्टॅण्ड आणि मैदानात नेमके कुठे, काय घडले हे तिने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे काही वर्षाचे प्रेमसंबंध तुटल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये नेसकडून मिळत असलेली वाईट वागणूकही तिने कथन केली. तसेच वानखेडेवरील वाद नेमका कशामुळे घडला, हेही तिने सांगितले. त्यात गरवारे स्टॅण्डमधील पहिल्या रांगेतील आसनव्यवस्था हेही एक कारण असल्याचे समजते.
यापैकी एका घटनेत नेस शिवीगाळ करत असताना जीन नावाचा तरूण मधे पडला आणि त्याने आमच्यातला वाद मिटविण्याचा प्रय} केला, असे तिने जबाबात सांगितल्याचे समजते. हा तरूण प्रीतीचा पाहुणा होता. तिच्या निमंत्रणावरून तो 3क् मे रोजी वानखेडेत पार पडलेला चेन्नई विरुद्ध पंजाब सामना पाहण्यास आला होता. पोलिसांच्या दृष्टीने तो या प्रकरणातला प्रमुख प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. पोलीस त्याचाही जबाब लवकर  नोंदवणार आहेत. याशिवाय आणखी चार ते पाच नव्या साक्षीदारांची नावे प्रीतीने जबाबात घेतली. या व्यक्ती घटना घडली तेव्हा आसपास उपस्थित होत्या, ते पोलिसांनी सांगितले.
नेस यांनी नेमक्या काय शिव्या दिल्या, काय भाषा वापरली हेही जाणून घेण्याचा प्रय} पोलिसांनी केला. ते शब्द बोलण्यास संकोच वाटत असल्यास लिहून द्या, अशी विनंतीही पोलिसांनी केली. त्यानुसार नेस-प्रीती यांच्यातला नेमका संवाद पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.
प्रीतीचा पुरवणी जबाब नोंदवण्यात आला. शिवाय घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या त्याचा प्रीती समक्ष स्पॉट पंचनामा केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली. मात्र प्रीतीने पुरवणी जबाबात नेमके काय सांगितले हे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दिला. नेस यांना अटक होईल, की त्यांचाही जबाब नोंदवला जाईल याबाबत त्यांनी मौन पाळले. (प्रतिनिधी)
 
नेसवर दोन दिवसांत कारवाई?
प्रीतीचा पुरवणी जबाब नोंदविण्याआधी मरिनड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी ज्या आठ जणांचे जबाब नोंदविले त्यापैकी दोनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यांनी जबाबातून प्रीतीची तक्रार खरी असल्याचे स्पष्ट केले. त्यात प्रीतीने नोंदवलेल्या पुरवणी जबाबातून हा पुरावा आणखी भक्कम झाल्याची माहिती मिळते. या जोरावर येत्या दोनेक दिवसांत नेस यांना याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.