शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या नोटाबंदीमुळे नेपाळ आर्थिक संकटात

By admin | Updated: January 15, 2017 00:19 IST

चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे शेजारच्या नेपाळमध्ये संकट उभे ठाकले आहे. आपल्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा

- नितीन अग्रवाल,  नवी दिल्ली

चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे शेजारच्या नेपाळमध्ये संकट उभे ठाकले आहे. आपल्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा भारताकडून बदलून घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत असलेल्या नेपाळने लवकरच हा प्रश्न सुटला नाही तर नेपाळी लोकांचा भारतावरील विश्वास उडून जाईल, असा इशारा दिला आहे.नेपाळचे भारतातील राजदूत दीप कुमार उपाध्याय म्हणाले की, भारत सरकारला विनंती करतो की हा प्रश्न लवकर सोडवावा अन्यथा नेपाळी लोकांचा आधी नेपाळ सरकारवरून आणि भारत सरकारवरील विश्वास उडून जाईल.’’ ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे नेपाळमध्ये लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी नेपाळ राष्ट्र बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी भारतात येऊन गेले. हे अधिकारी रिझर्व्ह बँक, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाशी उत्तर शोधण्यासाठी चर्चा करीत आहेत. आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन भारत सरकारने आम्हाला दिली असल्याची माहितीही उपाध्याय यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)- नेपाळ भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी अमेरिकन डॉलरच्या बदल्यात सरासरी ६०० कोटी रुपये मूल्यांच्या भारतीय नोटा घेतो. भारताच्या निर्णयामुळे नेपाळ राष्ट्र बँकेची फार मोठी रक्कम चलनातून बाद झाली आहे. नेपाळमध्ये काही लोक घसघशीत कमिशन घेऊन भारतीय नोटांना नेपाळी चलनात बदलून देत आहेत. भारताच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दीप कुमार उपाध्याय यांनी नेपाळी लोकांना त्यांनी घाईगर्दीत आपल्याकडील पैशांचे नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन केले.