मुख्य अंकासाठी नेमाडे प्रतिक्रिया
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
मुख्य अंकासाठी नेमाडे प्रतिक्रियानागपूर : मराठी साहित्य विश्वाला कथाप्रकारातून कांदबरीकडे नेणारे आणि कांदबरीतून देश्ीवाद जपताना मर्ढेकर केंद्री असणारे साहित्य नेमाडे केंद्री करुन स्वत:चा स्वतंत्र संप्रदाय निर्माण करणारे भालचंद्र नेमाडे याना ज्ञानपीठ सन्मान जाहीर करण्यात आला. त्यांना हा सन्मान मिळाल्यावर साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून मान्यवर साहित्यिकांनी नेमाडेंना मिळालेला हा सन्मान ...
मुख्य अंकासाठी नेमाडे प्रतिक्रिया
मुख्य अंकासाठी नेमाडे प्रतिक्रियानागपूर : मराठी साहित्य विश्वाला कथाप्रकारातून कांदबरीकडे नेणारे आणि कांदबरीतून देश्ीवाद जपताना मर्ढेकर केंद्री असणारे साहित्य नेमाडे केंद्री करुन स्वत:चा स्वतंत्र संप्रदाय निर्माण करणारे भालचंद्र नेमाडे याना ज्ञानपीठ सन्मान जाहीर करण्यात आला. त्यांना हा सन्मान मिळाल्यावर साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून मान्यवर साहित्यिकांनी नेमाडेंना मिळालेला हा सन्मान म्हणजे मराठी साहित्य आणि परंपरेचाच सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नेमाडेंची साहित्याची आत्मीयता विलक्षणच भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान लाभल्याचा आनंद मोठा आहे. त्यांना लाभलेला हा सन्मान मराठी साहित्याला समोर नेणारा आहे. साहित्य अकादमीच्या केंद्रीय समितीवर त्यांच्यासोबत मी काम करतो आहे. यानिमित्ताने त्यांची कार्यशैली जवळून अनुभविता येते. साहित्याविषयीची त्यांची आत्मियता आणि त्यासाठी लागणारे परिश्रम यात ते कधीच तडजोड करीत नाहीत. तात्विक भूमिका घेऊन जगणारे नेमाडे यांचे व्यक्तिमत्व सूक्ष्म अभ्यास करणारे आहे. त्यांना हा सन्मान लाभणे म्हणजे मराठी साहित्याचाच गौरव आहे. डॉ. अक्षयकुमार काळेज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक -----------------नेमाडेंची आव्हाने आजतागायत कायमचनेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान मिळाला याचा खूप आनंद वाटतो. हा सन्मान मराठी साहित्यासाठी त्यांना मिळाला. नेमाडेंनी भारतीय भाषांमधील सर्वात पुढे जाणारे साहित्य निर्माण केले. सर्वच साहित्यप्रकारात त्यांनी केलेले लेखन श्रेष्ठ आहे. एकच कांदबरी आणि त्याचा नायक अर्धशतकापेक्षा जास्त काळ वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात हा अपवादच आहे. कोसला आणि त्यातला पांडुरंगने साहित्याच्या मानदंडापुढे जी आव्हाने निर्माण केली ते आजतागायत तसेच आहे. हेच नेमाडेंचे यश आहे, असे मी मानतो. डॉ. प्रमोद मुनघाटेज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक