शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंची नेताजींच्या कुटुंबियांवर तब्बल २० वर्षे पाळत

By admin | Updated: April 10, 2015 11:47 IST

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्ब्ल २० वर्षे पाळत ठेवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर तब्ब्ल २० वर्षे पाळत ठेवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. १९४८ ते १९६८ या काळात बोस कुटुंबियांवर पाळत ठेवण्यात आली होती, अशी माहिती राष्ट्रीय संग्रहालयात असलेल्या गुप्तचर विभागाच्या कागदपत्रांतून समोर आली आहे. या २० वर्षांच्या कालावधीत नेहरू १६ वर्षे देशाचे पंतप्रधान होते आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी थेट त्यांच्याकडे अहवाल सादर करत असत.
ब्रिटीशांच्या काळापासून चालत आलेल्या आयबीने २० वर्ष बोस यांच्या कोलकात्यातील  वुडबन पार्क आणि ३८/२ इलगिन रस्त्यावरील बोस यांच्या घरांवर नजर ठेवली होती. बोस यांच्या कुटुंबियांनी लिहीलेली अथवा त्यांना आलेली पत्र तपासण्यापासून ते त्यांच्या देशांतर्गत वा परदेशातील प्रवासावरही बारकाईने पाळत ठेवण्यात येत होती. प्रामुख्याने बोस यांचे चुलत बंधू शिशिर बोस व अमेयनाथ बोस यांच्यावर पाळत ठेवम्यात येत होती.  बोस यांचे कुटुंबिय कोणाची भेट घेतात, त्यांच्याशी काय चर्चा करताते हे जाणून घेण्याचा आयबीचा प्रयत्न होता, अशीही माहिती समोर आली आहे. मात्र या पाळतीमागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.