शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

नेहरूंनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी केला नव्हता कोणताही करार

By admin | Updated: July 4, 2017 15:13 IST

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी कोणताही करार केला नव्हता

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4 - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी कोणताही करार केला नव्हता, याचा खुलासा 58 वर्षांनंतर झाला आहे. देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांच्या राजवटीत चीनसोबत सिक्कीम सीमेसंदर्भातील कोणत्याही संधीचं समर्थन केलं नव्हतं. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, 1959 सालात लिहिलेल्या एका पत्रानं याचा खुलासा झाला आहे. त्यावेळी नेहरूंनी चीनसोबत सिक्कीम सीमेबाबतच्या संधी करारावर स्वाक्षरी केली नव्हती. याचा खुलासा 58 वर्षांनंतर झाला आहे. त्यामुळे चीनच्या दाव्यातील हवाच निघून गेली आहे. चीनच्या मते, सिक्कीम सीमेवरून भारत आणि भूतानसोबत आमची संधी झाली होती. मात्र नेहरूंनी लिहिलेल्या या पत्राचा या दाव्यात कधीही उल्लेख केलेला नव्हता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनसोबत तिबेट आणि सिक्कीम सीमेसंदर्भात 1890मध्ये कोणतीही संधी केली नव्हती, ही बाब नेहरूंच्या पत्रामुळे समोर आली आहे. चीन, भूतान आणि भारताच्या डोंगराळ भागातल्या सीमेच्या वादामुळे भारत आणि चीनमधील मतभेद टोकाला गेले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जिंग शुआंग यांनी 22 मार्च, 1959 साली लिहिलेल्या या पत्राचा हवाला दिला होता.

(सिक्कीम सीमेवर भारतीय लष्करानं वाढवली कुमक)(सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द)
 
गेल्या काही दिवसांपासून सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीच्या आगळिकीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये महिन्याभरापासून तणातणी सुरू आहे. घुसखोरी केल्यानंतरही चीनने उलटा कांगावा सुरू ठेवला आहे. भारताने सिक्कीम सीमेवर बाजू भक्कम करण्यासाठी जादा जवान तैनात केले आहेत.भारतीय सीमेवर वाढीव जवान तैनात करणे याचा अर्थ युद्धाची तयारी करणे असा होत नाही. भारतीय लष्कर तिथे स्वतःच्या सीमेचं संरक्षण करण्याच्या पार्श्वभूमीत असेल. सिक्कीम सीमेवर सध्या उद्भवलेला तणाव हा 1962च्या युद्धानंतर भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये सर्वात दीर्घकाळ सुरू राहिलेला तिढा आहे. विशेष म्हणजे भारत आणि शेजारी भूतानने निषेध नोंदविल्यानंतर माघारी हटण्याऐवजी सीमेवरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घेतलेला आक्रमक पवित्रा, भारताचे सीमेवरील दोन बंकर नष्ट केले जाणे आणि चीनच्या राजनैतिक प्रतिक्रियेला चढलेली अधिक तिखट धार पाहता भारताने सावधानता म्हणून ही तयारी केली आहे. खुद्द लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन काही दिवसांपूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, चीन आणि देशांतर्गत अशांतता अशा अडीच आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, अशी ग्वाहीही जनरल रावत यांनी दिली होती.
डोका ला भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारीरिक रेटारेटी होऊन परिस्थिती गंभीर झाल्यानंतर भारतीय लष्कराने मेजर जनरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला तातडीने तेथे पाठवून चीनच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्याशी ध्वजबैठक घेण्याचा प्रस्ताव दिला. दोनदा नकार दिल्यानंतर तिसऱ्या वेळी चीन ध्वजबैठकीला आला पण डोका लाच्या लालटेन भागातून भारतानेच आपले सैन्य काढून घ्यावे, असा उरफाटा प्रस्ताव त्याने दिला. चीनने सिक्किम सीमेवरील या घटनाक्रमाचे निमित्त पुढे करून नथु ला खिंडीतून जाणारी कैलास-मानसरोवर यात्राही अडवून ठेवली. त्यामुळे चीन भारताला जेरीस आणण्याचे प्रयत्न सर्व पातळ्यांवर करत असल्याचे दिसते. परंतु भारताने आपली खंबीर भूमिका कायम ठेवून या दबावाला भीक घातलेली नाही.