भोपाळला शानदार सोहळ्यात लोकमत भवनाचे लोकार्पण : शिवराजसिंह चौहान, दिग्विजयसिंग यांची उपस्थिती
भोपाळ : लोकमत भवनाचे येथे शानदार समारंभात लोकार्पण झाले. लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी प्रतिस्पर्धी वृत्तपत्रचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर अग्रवाल यांना या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देत एक निकोप पायंडा पाडला आहे. मी त्यांच्या या पुढाकाराचे स्वागत करतो, असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. विचारांचे मतभेद असू शकतात. मनभेद असू नये हे त्यांनी सिद्ध केले आहे. लोकमत समूह अभिनंदनाचा हक्कदार आहे, असेही ते म्हणाले. स्पर्धा ही वृत्तपत्रंमध्ये नव्हे तर बातम्यांमध्ये असायला हवी. वृत्तपत्र हे वाचकांमुळे चालते. त्यांचे विचार अंतभरूत होणार नाहीत तोर्पयत एक चांगले वृत्तपत्र निघू शकत नाही, असे त्यावर खा. दर्डा यांनी स्पष्ट केले.
बुधवारी या समारंभाला माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे मुख्य पाहुणो म्हणून उपस्थित होते. खा. दर्डा म्हणाले की, स्पर्धा असायला हवी हे मी मानतो पण ती निकोप असावी. स्पर्धा होणार नाही तोर्पयत वृत्तपत्र चांगले होऊ शकत नाही.
एक वृत्तपत्र येत असेल तर दुस:या वृत्तपत्रचे लोक येत नाहीत हे आज मी बघतो आहे. ही बाब समाजाच्या हिताची नाही. एक- दुस:याचा सन्मान आवश्यक आहे. आम्ही सर्व मिळून समाजाला चांगले करण्याचा प्रयत्न करीत आहोत. खा. दर्डा यांनी हिंदी पत्रकारितेच्या क्षेत्रतील प्रयोगशीलतेबद्दल दैनिक भास्कर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर अग्रवाल यांची प्रशंसा केली. त्यांनी स्व. राहुल बारपुते, राजेंद्र माथूर, प्रभाष जोशी यांचे स्मरण करतानाच ज्येष्ठ पत्रकार अभय छजलानी यांच्याशी राहिलेल्या मधुर संबंधांचा उल्लेख केला.
लोकमत समूहाचा मराठीशी संबंध राहिला आहे, त्याचवेळी लोकमत समूहाने मराठी भागात हिंदीच्या प्रचार- प्रसारात मुख्य भूमिका बजावली आहे.
माङो वडील स्वातंत्र्यसेनानी तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्यामुळे अतिशय प्रभावित झाले होते. हिंदी ही एकमेव भाषा देशाला जोडू शकते या गांधीजींच्या मताचे ते खंदे समर्थक होते. मराठी प्रदेश असतानाही आम्ही बाबूजींच्या प्रेरणोने हिंदी वृत्तपत्रकडे पाऊल टाकले, असेही खा. दर्डा यांनी नमूद केले.
स्वतंत्ररीत्या वृत्तपत्र जगतात राहायचे असेल तर राजकारणापासून दूर राहा आधी स्वत:ला स्वतंत्र ठेवा. वृत्तपत्र काढताना राजकारण हे स्वातंत्र्याला अडसर म्हणून समोर येते. वृत्तपत्र वाचकांमुळे चालते. त्यांचे विचार वृत्तपत्रत येणार नाहीत तोर्पयत एक चांगले वृत्तपत्र निघू शकत नाही, असे बाबूजी म्हणाले होते, याचे स्मरणही खा. दर्डा यांनी करवून दिले. म्हणूनच राजकीय पाश्र्वभूमी असतानाही कधीही आपल्या पक्षाची विचारधारा वृत्तपत्रत अंतभरूत होऊ दिली नाही, याचाही त्यांनी आवजरून उल्लेख केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवराजसिंह चौहान, दिग्विजयसिंह, सुधीर अग्रवाल यांनी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्ज्वलित केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘स्टॅच्यू ऑफ फ्रीडम ऑफ प्रेस’ची प्रतिकृती भेट
च्सर्व पाहुणो आणि निमंत्रितांना स्टॅच्यू ऑफ फ्रीडम ऑफ प्रेसची प्रतिकृती भेट देण्यात आली.
च्बुटीबोरी येथील लोकमतच्या आर्ट ऑफ द प्रिंटिंग प्रेस येथे जगातील पहिला ‘स्टॅच्यू ऑफ फ्रीडम ऑफ प्रेस’ उभारण्यात आला आहे.
च्मान्यवर निमंत्रितांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या अनोख्या प्रतिकाच्या स्थापनेबद्दल खा. दर्डा यांची प्रशंसा केली.