शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थांची मानसिकता बदलाची गरज

By admin | Updated: March 18, 2016 00:18 IST

दिंडोरी : गावाचा सर्वांगीण विकास करून आदर्श गाव बनविण्यासाठी शासकीय योजना योग्य व प्रामाणिकपणे राबवून भौतिक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच हगणदारी मुक्ती, गाव स्वच्छता यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक ग्रामस्थाने आपणच सरपंच आहोत, या भूमिकेतून काम केल्यास आदर्श गाव होणे अवघड नाही, असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोद्याचे सरपंच ...

दिंडोरी : गावाचा सर्वांगीण विकास करून आदर्श गाव बनविण्यासाठी शासकीय योजना योग्य व प्रामाणिकपणे राबवून भौतिक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच हगणदारी मुक्ती, गाव स्वच्छता यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक ग्रामस्थाने आपणच सरपंच आहोत, या भूमिकेतून काम केल्यास आदर्श गाव होणे अवघड नाही, असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. मोहाडी (ता. दिंडोरी) येथे कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात आयोजित व्याख्यानात आदर्श गावनिर्मितीत लोकप्रतिनिधींची भूमिका व लोकसहभागाचे महत्त्व या विषयावर बोलत होते. याप्रसंगी त्यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर भरणार्‍या कुटुंबाला वर्षभर ॲक्वाचे शुद्ध पाणी व धान्य मोफत दळून देण्याची व्यवस्था, शंभर टक्के करवसुली, पर्यावरण संतुलित योजनेत व्यक्तिपरत्वे दोन झाडांचे संगोपन, गावातील अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ग्रामस्थांना ग्रामपंचायत आपली वाटावी यासाठी प्रत्येकाचा वाढिदवस साजरा करण्यात येतो. अशा अनेक बाबींमुळे गावाला दोन वेळा राष्ट्रपती पारितोषिक, तर भारतातील अकरा आदर्श ग्रामपंचायतीत स्थान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्र मात मविप्र सरचिटणीस नीलिमाताई पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल, भाऊलाल तांबडे यांची शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल व परिसरातील अकरा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी कादवाचे माजी अध्यक्ष बाजीराव कावळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार धनराज महाले, माणिकराव बोरस्ते, ओझर मर्चंट बॅँकेचे अध्यक्ष वसंत गवळी, डॉ. भाऊसाहेब मोरे, बी. पी. गायधनी, वसंत कावळे, अनिल कुंदे, सुनील मातेरे, संपतराव घडवजे, शहाजी सोमवंशी, सुरेश कळमकर, भाऊराव पाटील, राजाराम जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य विलास देशमुख, सूत्रसंचालन संजय डिंगोरे व जगदीश बोराडे, तर आभार गटनेते प्रवीण जाधव यांनी मानले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव प्रतिष्ठानसह उत्तम जाधव, प्रदीप जाधव, बापूसाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, रवींद्र जाधव, बाबा निकम.फोटो ओळ : मनोगत व्यक्त करताना भास्करराव पेरे पाटील, बाजीराव कावळे, माणिकराव बोरस्ते, धनराज महाले, भाऊलाल तांबडे, भाऊसाहेब मोरे व इतर. (फोटो : आयटीपीएचला दिंडोरी १ नावाने सेव्ह आहे.)