शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

पालिकेचे घोंगडे महावितरणच्या गळ्यात

By admin | Updated: March 19, 2016 00:03 IST

कंपनीकडून नकार : पालिकेला धाडणार पत्र

कंपनीकडून नकार : पालिकेला धाडणार पत्रनाशिक : पाणीपुरवठा काळात विद्युत मोटारींचा वापर करून पाणी ओढण्याच्या प्रकाराला आळा घालण्यास अपयशी ठरलेल्या महापालिकेने आपले घोंगडे महावितरणच्या गळी उतरविण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला आहे. पाणीपुरवठा काळात महावितरणने शहरात भारनियमन सुरू करावे अशी अजब सूचना पालिकेने पत्राद्वारे महावितरणला केली होती. या पत्राची खिल्ली उडवत महावितरणने पालिकेलाच उपाययोजना करण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते. महापालिकेने शहरात आठवड्यातून दर गुरुवारी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करतानाच पाणीबचत आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नाना तर्‍हेचे मार्ग अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने, विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्याचा प्रकार महापालिकेसाठी डोकेदुखी ठरल्याने त्याला पायबंद घालण्यासाठी विभागीय कार्यालयांना आदेश देण्यात आले होते. परंतु विभागीय कार्यालयाकडून सक्षमतेने कारवाई होत नसल्याने सहाही विभागातून केवळ १२५ विद्युत मोटारीच जप्त करण्यात आल्या तर केवळ दीड लाखांचा दंड करण्यात आला होता. एवढे होऊनही मोटारी लावून पाणी खेचण्याचा प्रकार सुरूच असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आल्याने पालिकेने जालीम तोडगा काढत महावितरणला भारनियमनाचे पत्र धाडले होते.शहरात होणार्‍या पाणीपुरवठा काळात पाइपलाइनमधून विद्युत मोटारी लावून पाण्याची चोरी होत असल्याने या काळात भारनियमन करण्यात यावे जेणेकरून पाणी उचलताच येणार नाही या महापालिकेच्या पत्राला महावितरणने धुडकावून लावले आहे. याबाबतचे अधिकृत पत्र अद्याप महापालिकेला धाडले नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे भारनियमन करताच येणार नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. भारनियमानाचे राज्यसाखळीतील नियोजित वेळापत्रक तयार केले जाते. शहराचा प्रकार, शहर कोणत्या श्रेणीत आहे, भारनियनाची वेळ कशी असेल याचा अभ्यास करून भारनियमनाची वेळ ठरविली जाते. शिवाय वीजपुरवठा हा फिडर निहाय केला जातो. १०० ते हजार घरांपयंर्तचा एक फिडर असतो. अशावेळी दोन-चार मोटारी लावणार्‍यांसाठी इतर ग्राहकांवर अन्याय करता येणार नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामुळे महावितरणने पालिकेच्या पत्राला फारसे गांभीर्याने घेतले नसून आपली भूमिका निश्चित केली आहे; मात्र अद्याप पालिकेला तसे कळविण्यात आलेले नाही. महावितरणचे मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता चर्चा करून या पत्राबाबत शासनालाही कळविणार आहेत.