शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
5
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
6
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
7
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
8
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
9
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
10
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
11
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
12
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
13
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
14
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
15
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
16
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
17
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
18
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
19
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
20
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल

संगम पुलाजवळ घर खचले

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

नागपूर : धंतोलीच्या संगम पूल परिसरात शुक्रवारी रात्री अचानक एक घर खचल्याने खळबळ उडाली. हे घर विष्णू शंकर डोंगरे नामक अंध व्यक्तीचे आहे. घटनेच्या वेळी डोंगरे व त्यांचे कुटुंबीय घरीच होते. लोकांनी वेळीच त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.विष्णू डोंगरे यांचे घर नागनदी शेजारी असलेल्या परिसरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री ...


नागपूर : धंतोलीच्या संगम पूल परिसरात शुक्रवारी रात्री अचानक एक घर खचल्याने खळबळ उडाली. हे घर विष्णू शंकर डोंगरे नामक अंध व्यक्तीचे आहे. घटनेच्या वेळी डोंगरे व त्यांचे कुटुंबीय घरीच होते. लोकांनी वेळीच त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
विष्णू डोंगरे यांचे घर नागनदी शेजारी असलेल्या परिसरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री ९ वाजताच्या सुमारास भूकंप झाल्यासारखे डोंगरे यांचे घर अचानक जमिनीत घुसले. त्यावेळी डोंगरे व त्यांची पत्नी व दोन मुले घरीच होते. अचानक झालेल्या प्रकारामुळे मुले व पत्नी बाहेर पडले, मात्र विष्णू डोंगरे अंध असल्याने त्यांना समजले नाही व ते तेथेच फसले. आरडाओरड केल्यानंतर आसपासचे नागरिक धावून आले व त्यांना बाहेर काढण्यात आले. दोनतीन दिवसापूर्वीच या भागात जमिनीला भेगा पडल्याचे लोकांनी सांगितले. प्राणहानी झाली नाही, मात्र डोंगरे यांच्या घरातील सर्व सामान व कपडेलत्ते नाल्यात वाहून गेले. याबाबत अग्निशमन विभाग व पोलिसांनाही कळविण्यात आले, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे विष्णू डोंगरे यांनी सांगितले. विष्णू अंध असूनही लुडो, चेस, सापशिडी यांसारख्या खेळाचे साहित्य तयार करण्याचे काम करतात. सिव्हील लाईन भागात रस्ता रुंदीकरणात निवारा गेल्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्तांनी संगम पुलाजवळ राहण्यासाठी जागा दिल्याचे डोंगरे यांनी सांगितले. मात्र शुक्रवारच्या घटनेमुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे.