शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधी निवडणुका झाल्यास एनडीएला मिळणार 360 जागा

By admin | Updated: January 27, 2017 00:13 IST

लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास एनडीए पुन्हा 360 खासदारांसह केंद्रातील सत्तेत येऊ शकते.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - केंद्रातल्या मोदी सरकारला जवळपास अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र तरीही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली दिसत नाही. इंडिया टुडे ग्रुप आणि KARVY INSIGHTS च्या सर्व्हेनुसार लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास एनडीए पुन्हा 360 खासदारांसह केंद्रातील सत्तेत येऊ शकते. यूपीएला 60 जागा, तर इतर पक्षांना 123 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 राज्यांमधील 12,143 लोकांनी केलेल्या सर्व्हेनुसार आता निवडणुका लागल्यास भाजपा नेतृत्वाखालील एनडीएला 42 टक्के मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीएला फक्त 25 टक्के मतं मिळाली आहेत. यूपीएच्या तुलनेत एनडीए दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचं या पोलमधून समोर आलं आहे. इतर पक्षांना 33 टक्के मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान म्हणून मोदी चांगलं काम करत असल्याचं 69 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तसेच मोदींच्या कामाला 19 टक्के लोकांनी सरासरी पसंती दिली आहे. तर 3 टक्के लोकांनी कामगिरी वाईट, 6 टक्के लोकांनी अतिशय वाईट अशी प्रतिक्रिया दिली आहे. एनडीए सरकारच्या कामाला 71 टक्के लोकांनी चांगलं म्हटलं आहे. 97 संसदीय आणि 194 विधानसभा क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून योग्य पर्याय असतील. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना 65 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर राहुल गांधींना फक्त 10 टक्के, तर सोनिया गांधींना 4 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. मुलायम सिंह यादव, मायावतींना प्रत्येकी 1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अरुण जेटलींना 2 टक्के लोक पंतप्रधानपदाचे उमेदवार मानतात. तर केजरीवाल, प्रियंका, नितीशकुमार यांना 2 टक्के लोकांनी निवडलं आहे. नोटाबंदीच्या मोदींच्या निर्णयामुळे 45 टक्के लोकांनी काळा पैशाला आळा बसल्याचं म्हटलं आहे. तर 35 टक्के लोकांनी अर्थव्यवस्था सुधारल्याचं मत मांडलं आहे. अरुण जेटलींच्या कामाला 23 टक्के, तर सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंह यांच्या कारभाराला 21 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. मनोहर पर्रिकरांना 13 टक्के तर उमा भारतींनी 12 टक्के चांगलं काम केल्याचं म्हटलं आहे. मोदींविरोधात तिसरा पर्याय म्हणून 11 टक्के लोकांनी केजरीवालांना पसंती दिली आहे. नितीशकुमारच्या नेतृत्वात 10 टक्के लोकांना चांगलं भविष्य दिसत आहे.