शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएची एकजूट!

By admin | Updated: April 11, 2017 04:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजधानीतील निवासस्थानी बोलाविलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला शिवसेनेसह ३२ घटक पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याने सत्ताधारी

- हरिश गुप्ता, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजधानीतील निवासस्थानी बोलाविलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला शिवसेनेसह ३२ घटक पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याने सत्ताधारी आघाडी आजही एकत्र असल्याचा संदेश गेला. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली असताना सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा भाजपाचा हेतू बैठकीमुळे साध्य झाला.पुढील म्हणजे २०१९ची निवडणूकही मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नंतर सांगितले. सतत राज्य व केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीला हजर होते. जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या आणि आॅगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या पसंतीचे उमेदवार उभे करून निवडून आणायचे असून, त्यासाठी मतैक्य घडवून आणणे भाजपासाठी गरजेचे आहे. त्याबाबत बैठकीत थेट चर्चा झाली नसली तरी त्यादृष्टीने पडलेले हे पहिले पाऊल होते. अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हेही बैठकीसाठी आले होते. यंदा तसे नकोपूर्वी शिवसेना व जनता दल (संयुक्त) रालोआचे घटक होते. तरीही या दोघांनी दोन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला मदत केली नव्हती. शिवसेनेने प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. यंदा शिवसेनेने वा कोणत्याच घटक पक्षाने असे करू नये, अशी भाजपाची इच्छा आहे. त्यामुळेच खा. रवींद्र गायकवाड विमानबंदीवरून शिवसेनेमध्ये असलेली नाराजी दूर करण्यात आली.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरची रष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची ही सर्वांत मोठी बैठक होती, असे म्हणता येईल, कारण सर्व घटक पक्षांचे नेते बैठकीला हजर होते. सत्तेत नसलेले, पण भाजपासमवेत राज्यात एकत्र असणारे पक्षांचे नेतेही बैठकीला आले होते.