शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची कसोटी

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

महापालिका निवडणूक : पॅनल पुर्ण होईना

महापालिका निवडणूक : पॅनल पुर्ण होईना

पंचवटी (संदीप झिरवाळ) : आगामी महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी अद्याप पर्यंत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पॅनल पुर्ण न झाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसला भाजपाशी टक्कर देण्यासाठी मोठी कसोटी करावी लागणार आहे. सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून दोन विद्यमान नगरसेवक रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू असुन पॅनलमध्ये अन्य दोन सक्षम उमेदवारांचा पक्षाला शोध घ्यावा लागणार आहे.
सध्या दोघे विद्यमान नगरसेवक निवडणुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असले तरी कधी हा तर कधी ना अशीच काहीशी चर्चा या दोहो उमेदवारांपैकी एका उमेदवाराची असल्याने तसेच अन्य एक उमेदवार अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते हवालदिल झाले आहे. सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी करणार्‍या इच्छुकांनी स्वत:च एकला चलो रे ची भूमिका घेत प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपा, मनसे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत या प्रभागातून निवडूून आलेले होते तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या एका विद्यमान नगरसेवकाने भाजपात तर भाजपाच्या एका महिला नगरसेवकाने मनसेत प्रवेश केला आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये खरी लढत सेना भाजपात होण्याची शक्यता असली तरी मनसे व राष्ट्रवादी कॉँग्रेसने उमेदवार उभे करून सेना भाजपाला शह देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आमदार बाळासाहेब सानप यांचा हा प्रभाग असल्याने सानप यांनी या प्रभागाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीकडे दोन विद्यमान नगरसेवक असले तरी अद्याप दोन सक्षम उमेदवारच नसल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पॅनल सध्या तरी अपुर्ण आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये १ जागा इतर मागास प्रवर्ग, १ सर्वसाधारण पुरूष तर २ जागा महिला सर्वसाधारण असे आरक्षण आहे.
इन्फो बॉक्स
सोशल मिडीयावर झाले लोकप्रतिनिधी
भाऊ आमचा गुणाचा, भाऊच प्रभागाचा विकास करू शकतो, भाऊ अर्ध्यारात्री मदतीला धावतो असे नाना प्रकारचे संदेश सोशल मिडीयावर इच्छुक उमेदवारांचे समर्थक झळकावून आपापल्या पक्षाचा उमेदवार किती सक्षम आहे या पोस्ट शेअर करण्याचे काम करत आहेत. इच्छुकांच्या पोस्ट सोशल मिडीयावर झळकत असल्याने इच्छुक जणू निवडणूकीपुर्वी आपणच निवडून आल्याचा आनंद व्यक्त करत आहे.