शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘एनसीसी’च्या मुलींनाही हवाईदलात समान संधी

By admin | Updated: May 7, 2017 01:19 IST

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) ‘एअर विंग’मधून ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या मुलींनाही आता हवाईदलाच्या भरतीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) ‘एअर विंग’मधून ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या मुलींनाही आता हवाईदलाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा न देता थेट मुलाखतीला जाण्याचे दरवाजे खुले झालेआहेत.तिन्ही सैन्यदलांमधील भरतीसाठी ‘कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन’ (सीडीएस) ही परीक्षा घेतली जाते. ही भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, ‘स्टाफ सिलेक्शन बोर्डा’कडून घेतली जाणारी तोंडी मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी अशी तीन टप्प्यांमध्यो होते.‘एनसीसी’मध्ये सहभागी होऊन ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या उमेदवारांना यात लेखी परीक्षा न देता थेट तोंडी मुलाखतीला बोलाविले जाते. ही सवलत आतापर्यंत फक्त पुरुष उमेदवारांनाच मिळत असे. हवाईदलाने आता ही सवलत महिलांनाही देण्याचे ठरविल्याने ‘एनसीसी’च्या ‘एअर विंग’मधून ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या मुलीही यापुढे हवाईदलातील भरतीसाठी ‘स्टाफ सिलेक्शन बोर्डा’च्या तोंडी मुलाखतीसाठी थेट बोलाविल्या जातील. यंदाच्या ‘सीडीएस’ परीक्षेसाठी आॅनलाइन नोंदणी व अर्जस्वीकृती २० मेपासून सुरु होत असून ती १५ जूनपर्यंत सुरु राहील.‘एनसीसी’ केलेल्या विद्यार्थ्यांनी हवाईदलात सामिल व्हावे यासाठी आम्ही नेहमीच प्रोत्साहन देत आलो आहोत. त्याचाच एक भाग म्हणून ‘एनसीसी’च्या ‘एअर विंग’मधून ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्यांना भरतीच्या वेळी थेट मुलाखतीसाठी बोलावण्याची पद्धत आम्ही सुरु केली. यातही समानता असावी यासाठी आता मुलांप्रमाणे मुलींनाही ही सवलत देण्यात येणार आहे. परिणामी ‘एनसीसी’च्या ‘एअर विंग’मधील मुलीही आता हवाईदलाच्या भरतीमध्ये मुलांच्या बरोबरीने सहभागी होऊ शकतील.सैन्यदलांत अत्यल्प महिलातिन्ही सैन्यदलांमध्ये आणि त्यातही अधिकाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. १३ लाखांच्या सैन्यदलांमध्ये ५९,४०० अधिकारी आहेत. त्यात सर्वाधिक १,३५० महिला अधिकारी हवाईदलात आहेत. लष्करात १,३०० तर नौदलात ४५० महिला अधिकारी आहेत.फ्लार्इंग आॅफिसर असलेल्या अवनी चतुवर्दी, भावना कांत आणि मोहना सिंग या तीन महिला गेल्या वर्षी १८ जून रोजी प्रथमच हवाईदलात लढाऊ विमानाच्या वैमानिक म्हणून दाखल झाल्या होत्या.