एनसीसीच्या वार्षिक प्रशिक्षणाची सांगता
By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST
एनसीसीच्या वार्षिक प्रशिक्षणाची सांगता
एनसीसीच्या वार्षिक प्रशिक्षणाची सांगता
एनसीसीच्या वार्षिक प्रशिक्षणाची सांगताविविध विषयांवर मार्गदर्शन : एकूण ३७२ कॅडेटस् सहभागीसावनेर : एनसीसी २० महाराष्ट्र बटालियनच्यावतीने १० दिवसीय प्रशिक्षण शिबिराची नुकतीच सांगता करण्यात आली. यात एकूण ३७२ कॅडेटस् सहभागी झाले होते. त्यांना विविध बाबींचे प्रशिक्षण देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.कॅम्प कमांडर कर्नल ओ. पी. सिंह यांच्या नेतृत्वातील या प्रशिक्षण शिबिरात वरिष्ठ छात्र सेनेचे १२८ विद्यार्थी, ४९ विद्यार्थिनी, कनिष्ठ राष्ट्रीय छात्रसेनेचे १५२ विद्यार्थी, ४४ विद्यार्थिनी असे एकूण ३७२ कॅडेटस्, चार एनसीसी अधिकारी, पाच जेसीओ आणि १३ एनसीओ सहभागी झाले होते. या प्रशिक्षण शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, अवयव दान, प्राथमिक उपचार, फायर फायटिंग, नागरिक सुरक्षा, समाजसेवा, नेतृत्व, पर्यावरण संवर्धन आदी विषयांवर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी कॅम्प ॲडज्युडंट प्रा. बाबा टेकाडे, मेजर प्रा. वाय. डी. सिंग, सुभेदार मेजर जोगेंद्र सिंग, फर्स्ट ऑफिसर ए. एस. तल्हार, थर्ड ऑफिसर अंजना रॉय, सुभेदार रामसिंग, कंपनी हवालदार मेजर जसविंदर सिंग, बी. एच. एम. राजेंद्र केंद्रे, फनिंद्र कनवर, नायब सुभेदार हरविंदर सिंग, तरसिम सिंग, एस. एच. बांबल, अर्चना देव, डी. टी. देवीकर आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)***