शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

राम कदम यांच्याविरोधात एनसी दाखल

By admin | Updated: September 26, 2014 02:16 IST

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान धार्मिक प्रचार केल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपात आलेले आमदार राम कदम यांच्याविरोधात अदखलपात्र तक्राल (एनसी) नोंदवण्यात आली

मुुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान धार्मिक प्रचार केल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपात आलेले आमदार राम कदम यांच्याविरोधात अदखलपात्र तक्राल (एनसी) नोंदवण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेली तक्रार पोलिसांकडे धाडून कारवाईचे आदेश दिले. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. लोकवर्गणीतून उमेदवारी अर्ज भरण्याचा निश्चय कदम यांनी केला आहे. त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते घाटकोपर पश्चिम मतदारसंघात फिरून एकेक रूपया वर्गणी म्हणून गोळा करत आहेत. गेल्या पाचेक दिवसांपासून लोकवर्गणी गोळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र वर्गणी गोळा करण्यासाठी कदम यांच्याकडून कार्यकर्त्यांना जे डबे मिळाले आहेत त्यावर साईबाबांचा फोटो आहे. त्याला शिवसेनेचे विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी आक्षेप घेतला. कदम मतदारसंघात धार्मिक प्रचार करत आहेत, हे अचारसंहितेचे उल्लंघन आहे, असा आरोप करत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. घाटकोपर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना गेवराईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतनगर परिसरात साईबाबांची रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीच्या आधारे कदम यांच्या उमेदवारी अर्जासाठी कार्यकर्ते वर्गणी देण्याचे आवाहन मतदारांना करत होते, अशीही तक्रार मोरे यांनी केली. या तक्रारीत तथ्य आढळल्याने ती पुढील कारवाईसाठी पार्कसाईट पोलीस ठाण्याकडे धाडण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार कदम यांच्याविरोधात एनसी नोंदविल्याचे पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक सुरेश सकपाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)