नवी दिल्ली : वर्षभरात विविध ठिकाणांहून नक्षलवादी सुमारे 14क् कोटींची वसुली करीत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी राज्यसभेला बुधवारी दिली. गेल्या दहा वर्षात नक्षलवाद्यांनी पाच हजारांहून अधिक नागरिकांचा बळी घेतला असून त्यात सर्वात जास्त आदिवासी आहेत असे ते पुढे म्हणाले.
या कट्टरवादी संघटनांनी आपल्या भागातील उद्योगपती, ठेकेदार, तेंदूपत्त्याचे ठेकेदार, वाहतूकदार, सरकारी कर्मचारी व खाण माफियांकडून ही करवसुली केल्याचे त्यांनी पुढे म्हटले.
दिल्लीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स स्टडीज अॅन्ड अॅनालिसीसच्या अहवालानुसार नक्षलवाद्यांनी 14क् कोटींहून अधिक रक्कम खंडणीच्या रूपात वसूल केली आहे. तसेच 2क्क्4 ते 2क्14 दरम्यान त्यांनी पाच हजाराहून अधिक नागरिकांना ठार मारले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)