गमावलेला लोकाधिकार मिळवण्याकरिता नक्षली सक्रिय पंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रीत
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
रायपूर-आमच्या उमेदवारांना मते द्या नाहीतर निवडणुकीवर बहिष्कार घाला अशी हाकाटी करून नक्षलवाद्यांनी त्यांनी गमावलेला लोकाधिकार पुन्हा मिळविण्याकरिता पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपले माध्यम बनविले आहे. छत्तीसगड पोलिसांच्या सशक्त शोध मोहिमांमुळे भयकंपित झालेल्या नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना अशा प्रकारच्या धमक्या देणे सुरू केले आहे.
गमावलेला लोकाधिकार मिळवण्याकरिता नक्षली सक्रिय पंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रीत
रायपूर-आमच्या उमेदवारांना मते द्या नाहीतर निवडणुकीवर बहिष्कार घाला अशी हाकाटी करून नक्षलवाद्यांनी त्यांनी गमावलेला लोकाधिकार पुन्हा मिळविण्याकरिता पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपले माध्यम बनविले आहे. छत्तीसगड पोलिसांच्या सशक्त शोध मोहिमांमुळे भयकंपित झालेल्या नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना अशा प्रकारच्या धमक्या देणे सुरू केले आहे. पत्रकांच्या माध्यमातून नक्षल्यांनी पंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालून क्रांतिकारी सरकारला भक्कम करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात २८ जानेवारीपासून चार टप्प्यात पंचायत निवडणुका होत आहेत.राज्याच्या गुप्तचर विभागाचे पोलीस महासंचालक दीपांशु काबरा यांनी, नक्षल्यांनी ग्राम पंचायतींच्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच ते उमेदवारांना धमकावून त्यांच्याजवळून खंडणी वसूल करीत असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. १० जानेवारी रोजी नक्षल्यांनी सुकमा जिल्ह्यात सरपंच व पंचाची निवडणूक लढविणाऱ्या गावकऱ्यांची बैठक घेतली. नक्षल्यांनी दिलेल्या आमंत्रणानुसार ३५ गावकरी घनदाट जंगलात गेले होते. नक्षल्यांनी त्यांच्याकडे चार दिवस चौकशी केली व नंतर त्यांना सोडून दिले. अशा पद्धतीने अन्य जिल्ह्यांमध्येही बैठकी घेऊन धमक्या दिल्या जात असल्याचे काबरा यांनी सांगितले. नक्षलवाद्यांनी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे प्रवक्ते गुडसा उसेंडी यांच्या नावाने पाठविलेल्या पत्रकात ही बहिष्काराची व नक्षल्यांच्या सरकारला निवडून देण्याची मागणी केली आहे.