शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

भर मंडपातून तरूणीने केले नवरदेवाचे अपहरण

By admin | Updated: May 17, 2017 19:37 IST

उत्तर प्रदेशमध्ये बॉलिवूडच्या सिनेमाप्रमाणे एक वेगळीच घटना घडली आहे. एका तरूणीने व-हाडींना बंदूकीचा धाक दाखवून भर मंडपातून नवरदेवाचे अपहरण केले आहे.

ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 17 - उत्तर प्रदेशमध्ये बॉलिवूडच्या सिनेमाप्रमाणे एक वेगळीच घटना घडली आहे. एका तरूणीने व-हाडींना बंदूकीचा धाक दाखवून भर मंडपातून नवरदेवाचे अपहरण केले आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मौदहा गावात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 
बांदा येथे एका डॉक्टरकडे अशोक हा कंपाऊंडर म्हणून काम करतो. त्याचं क्लिनिकमध्येच काम करणाऱ्या एका मुलीशी प्रेम होते. दोघांनी एकमेकांना लग्नाचं वचन दिलं होतं. पण याच दरम्यान भवानीपूरच्या एका मुलीबरोबर अशोकचं लग्न ठरलं.  मौदहा येथे अशोकच्या लग्नाची तयारी सुरू होती. लग्नाच्या दिवशी अचानक ती तरूणी भरमंडपात बंदूक घेऊन आली. "प्रेम माझ्याशी केलं आणि लग्न दुसरीसोबत करतो? मी हे कधीच सहन करणार नाही," असं म्हणत कोणाला काही समजण्याच्या आत तरूणीने भरमंडपातून अशोकचे कॉलर पकडून त्याला ओढत नेऊन गाडीत कोंबले आणि पसार झाली. या दरम्यान लग्नमंडपातील वीज अचानक घालवण्यात आली होती. 
 
भरमंडपातून एवढ्या लोकांच्या उपस्थितीत एखादी तरूणी एखाद्याचे अपहरण कसेकाय करू शकते? कोणी त्या तरूणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले असून  तरूणी आणि नवरदेवाच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी अशोकचा भाऊ आणि काही फोटोग्राफर्सना ताब्यात घेण्यात आलं आहे.  
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोघांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.