शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निवडणुकीसाठी रालोआचे जागावाटप

By admin | Updated: September 1, 2015 02:11 IST

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआच्या घटक पक्षांमधील जागा वाटप येत्या आठवडाभरात जाहीर करण्यात येईल. जागा वाटपावरून रालोआत कसलेही

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआच्या घटक पक्षांमधील जागा वाटप येत्या आठवडाभरात जाहीर करण्यात येईल. जागा वाटपावरून रालोआत कसलेही मतभेद नाहीत, असे केंद्रीय आणि लोजपाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी सोमवारी पाटणा येथे पत्रकारांना सांगितले.बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्याला ठराविक जागा मिळाव्या अशी मागणी करीत असलेल्या रालोआच्या घटक पक्षांनी सोमवारी एकीचे प्रदर्शन करीत बैठक घेतली. तथापि या पहिल्या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा झाली नाही. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.पासवान यांनी पत्रकारांना दीड तास चाललेल्या या बैठकीतील चर्चेची माहिती दिली. रालोआचे जागा वाटप लवकरच केले जाईल. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली नाही. आम्ही केवळ निवडणूक प्रचार कसा राहील याबाबत चर्चा केली आणि रालोआ बिहारमध्ये दोन तृतीयांश बहुमताने विजयी होईल, असा विश्वास पासवान यांनी व्यक्त केला.रविवारी पाटणा येथे पार पडलेल्या राजद-संजद-काँग्रेसच्या स्वाभिमान रॅलीची ‘फ्लॉप शो’ अशी संभावना करून पासवान पुढे म्हणाले, या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा अवमान करण्यात आला. त्यांना मुख्यमंत्री नितीशकुमार, संजद अध्यक्ष शरद यादव आणि राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या आधी भाषण द्यावे लागले. भाजपाने राज्यात केवळ १०२ जागा लढवाव्या आणि उर्वरित १४२ जागा मित्र पक्षांसाठी सोडाव्या, या लोजपा आणि रालोसपाने केलेल्या मागणीबाबत विचारले असता पासवान म्हणाले, हे फारसे महत्त्वाचे नाही. या मुद्यावर आता एकाही नेत्याने वक्तव्य न करण्याचे आणि केवळ अधिकृत नेत्यांनीच बोलायचे ठरले आहे.