शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याजवळ समुद्रात नौदलाचे विमान कोसळले

By admin | Updated: March 26, 2015 01:16 IST

गोव्याजवळ खोल समुद्रात मंगळवारी रात्री नौदलाचे डॉर्नियर हे टेहळणी विमान कोसळून दोघे अधिकारी बेपत्ता झाले आहेत. त्यात एका महिलेचाही समावेश आहे.

पणजी : गोव्याजवळ खोल समुद्रात मंगळवारी रात्री नौदलाचे डॉर्नियर हे टेहळणी विमान कोसळून दोघे अधिकारी बेपत्ता झाले आहेत. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. विमानाच्या कॅप्टनला वाचवण्यात मच्छीमारांना यश आले. नऊ नौकांद्वारे दोघा बेपत्ता प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. गोव्याजवळ २५ सागरी मैलावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास खोल समुद्रात हे विमान कोसळले. डॉर्नियर विमान कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे. नौदलाच्या गोवा केंद्राशी या विमानाचा रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी संपर्क तुटला. दुर्घटनेनंतर प्रशिक्षणार्थी निरीक्षक महिला व प्रशिक्षणार्थी पायलट बेपत्ता झाले आहेत. दुर्घटनेच्या एका तासानंतर लेफ्टनंट कमांडर कुलदीप जोशी यांना वाचविण्यात मच्छीमारांना यश आले. मच्छीमारी बोटीवरील खलाशांनी नौदलाशी संपर्क केल्यानंतर नौदलाच्या विमानाने कॅप्टन जोशी यांना रुग्णालयात हलविण्यात आले. भारतीय नौदलाच्या सेवेत ९0 च्या दशकात डॉर्नियर विमाने दाखल झाली.