शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योत सिद्धूचे मंत्रिपद वाचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 04:00 IST

३० वर्षांपूर्वीच्या खटल्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने, पंजाबच्या काँग्रेस सरकारमधील पर्यटनमंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे मंत्रिपद वाचले.

नवी दिल्ली : ३० वर्षांपूर्वीच्या खटल्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने, पंजाबच्या काँग्रेस सरकारमधील पर्यटनमंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे मंत्रिपद वाचले. दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाली असती, तर सिद्धूंना राजीनामा द्यावा लागला असता.सिद्धू व त्यांचे मित्र रूपिंदर सिंग संधू २७ डिसेंबर १९८८ रोजी पतियाळा जिल्ह्यात महामार्गावर मोटार उभी करून खरेदी करायला गेले होते. गुरनाम सिंग या मोटारचालकाने त्यास आक्षेप घेतला. त्या वेळी रागाच्या भरात सिद्धू व संधू यांनी गुरनाम यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचे निधन झाले. या खटल्यात सत्र न्यायालयाने सिद्धू व संधू यांना निर्दोष मुक्त केले. मात्र, उच्च न्यायालयाने सिद्धू यांना सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरवून, तीन वर्षांचा कारावास व एक लाख रुपये दंड ठोठावला. सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत जामीन दिल्याने सिद्धू तुरुंगात गेले नाहीत.याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दोन अपिले केली गेली. खंडपीठाने सिद्धू यांना भादंवि कलम ३२३ अन्वये किरकोळ दुखापत करण्याच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून एक हजार रुपये दंड ठोठावला.> एक हजार रुपये दंड ठोठावून न्यायालयाने थट्टा करीत मयताच्या जखमांवर मीठ चोळले आहे. सिद्धू ‘सेलिब्रिटी’ असल्याने मवाळ शिक्षा दिली गेली.- अभिजीत, गुरनाम सिंग यांचा कुटुंबीय> जनतेच्या प्रार्थनेमुळेच मी ताठ मानेने बाहेर पडलो. माझे आयुष्य सर्वस्वी जनतेच्या हाती सोपवित आहे, असा संदेश राहुलजी व सोनियाजी यांनी पाठविला आहे.- नवज्योत सिंग सिद्धू