शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागिन डान्स केला म्हणून नवरीने मोडलं लग्न

By admin | Updated: June 30, 2017 10:46 IST

लोकप्रिय नागिन डान्स एका नवरदेवाला चांगलाच भारी पडला आहे.

ऑनलाइन लोकमत

शहाजहांपूर, दि. 30- लग्न समारंभात विशेष करून हळदीमध्ये किंवा लग्नाच्या वरातीत बिनधास्तपणे नाचताना लोक नेहमीच दिसत असतात. सध्या कोणताही कार्यक्रम हा नागिन डान्स केल्याशिवाय पूर्ण होत नाही, असं म्हणायलासुद्धा काहीही हरकत नाही. पण हा लोकप्रिय नागिन डान्स एका नवरदेवाला चांगलाच भारी पडला आहे. लग्नाच्या दिवशी दारू प्यायलेल्या नवऱ्याला नागिन डान्स करताना पाहून संतापलेल्या नवरीने चक्क तेव्हाच लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आणि लग्न मोडलंसुद्धा. आपला होणाऱ्या नवऱ्याला दारूच्या नशेत नाचताना पाहून त्या मुलीची मान शर्मेने खाली गेली, म्हणूनच तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी हा संपूर्ण प्रकार घडला आहे. 
 
मुलीने लग्न मोडू नये यासाठी त्या मुलीच्या कुटुंबियांनी तिला खूप समजाण्याचा प्रयत्न केला पण ती नवरी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी नवरदेवाला आल्या पावली परत फिरावं लागलं. लग्न स्थळावर मारामारी होऊ नये यासाठी पोलिसांनाही बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर एक दिवसानंतर त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी करण्यात आलं. प्रियंका त्रिपाठी या तेवीस वर्षीय तरूणीचं लग्न अनुभव मिश्राशी होणार होतं. या दोघांची कुटुंबं एकमेकांना काही वर्षापासून ओळखत होती. तसंच दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नासाठीच्या भेटवस्तूंची देवाणघेवाणसुद्धा झाली होती. 
 
लग्नाच्या दिवशी वऱात घेऊन येताना मुलाचं लक्ष डीजेवर सुरू असलेल्या गाण्याकडे गेलं आणि त्याने त्या गाण्यावर नागिन डान्स करायला सुरूवात केली. नवरदेवाला नाचताना पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्यावर पैसे उडवायला सुरूवात केली. हे सगळं चित्र बघून मुलीच्या घरचे थक्क झाले. त्याच वेळी दारूच्या नशेत नाचणार अनुभव आपल्या लायकीचा नाही हे त्या मुलीने ठरवलं. प्रियंकाने लग्न मोडू नये साठी तिच्या घऱच्यांनी समजून काढण्याचा प्रयत्न केला पण प्रियंकाने आपला निर्णय बदलला नाही. शेवटी वरात घेऊन मुलाकडील मंडळींना घरी परत फिरावं लागलं.