शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१३०० बचत गटांना १६ कोटींचे वाटप राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान : ७९१ बचतगटांना कर्जाची प्रतिक्षा

By admin | Updated: February 22, 2016 00:03 IST

जळगाव : राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानातंर्गत या वर्षभरात दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी १३०० बचत गटांना १५ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहे. तर ७९१ बचतगट कर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.

जळगाव : राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानातंर्गत या वर्षभरात दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी १३०० बचत गटांना १५ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहे. तर ७९१ बचतगट कर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात करण्याच्या निर्णयानुसार राज्यात १८ जुलै २०११ पासून स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानात रुपांतर झाले आहे.
दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचे उत्पन्न वाढविणे हा उद्देश
वंचित दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची स्वयंरोजगारीची क्षमता वाढविणे, स्वयंरोजगारींना लाभदायक क्षमतावृध्दी, स्वयंरोजगार व कौशल्यावर आधारित रोजगाराची संधी उपलब्ध करुन स्वरोजगारीचे कायम स्वरुपी उत्पन्न वाढवुन त्यांना दारिद्रय रेषेच्या वर आणने हा मुख्य उद्देश आहे.

२६ कोटीच्या कर्ज वाटपाचे उद्दिट्य
योजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन हजार १०१ बचत गटांना २६ कोटी २५ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आहे. मात्र जिल्हाभरातील दोन हजार १२० बचत गटांनी तब्बल २९ कोटी २२ लाखांचे कर्जप्रकरणे विविध बँकांमध्ये सादर केले आहेत.

१४७१ बचतगटांचे प्रकरणे मंजूर
या योजनेतंर्गत बचत गटांतर्फे सादर करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांपैकी एक हजार ४७१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यात या बचत गटांना १८ कोटी ५४ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम मंजुर करण्यात आली. जानेवारी महिन्यापर्यंत त्यातील १३०० प्रकरणांना १५ कोटी ९९ लाखांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

इन्फो-
२९ बचत गटांचे प्रस्ताव नाकारले
या योजनेतंर्गत दाखल केलेल्या २९ बचत गटांचे प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. या बचत गटांनी ४३ लाख ७० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. यात जळगाव, मुक्ताईनगर व रावेर या तालुक्यांमधील बचत गटांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पाठोपाठ जामनेर व पाचोरा या तालुक्यातील बचत गटांचे कर्जप्रकरणे नाकारण्यात आले आहेत.