राष्ट्रीय : महत्त्वाचे
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
राष्ट्रीय-महत्त्वाचे
राष्ट्रीय : महत्त्वाचे
राष्ट्रीय-महत्त्वाचेभारत-म्यानमार सीमेवर बॉम्बस्फोट, एक ठारइम्फाल : मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यातील भारत-म्यानमार सीमेवर गुरुवारी सायंकाळी एका शक्तिशाली बॉम्बचा स्फोट होऊन त्यात एक जण ठार आणि दोघे गंभीर जखमी झाले. या भागात तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य बनवून हा बॉम्ब रस्त्याच्या कडेला पेरून ठेवण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. या स्फोटाचा आवाज काही कि.मी. पर्यंत ऐकण्यात आला.अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोन तरुणांना अटकप्रतापगड : उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील कचवा बाजान गावात एका १२ वर्षांच्या मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. हे तरुण मुलीच्याच गावातील आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. ही मुलगी सकाळी घराबाहेर गेली असताना तरुणांनी तिला चाकूचा धाक दाखवून निर्जन स्थळी नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.मुजफ्फरनगर दंगल : एसआयटीचा क्लोजर रिपोर्टमुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर दंगलीचा तपास करीत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही, असे सांगत पत्रकार राजेश वर्मा हत्याप्रकरणी आपला क्लोजर रिपोर्ट गुरुवारी मुख्य न्याय दंडाधिकारी नरेंद्र कुमार यांच्या न्यायालयात सादर केला. या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप सादर करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.मालदा येथे बनावट नोटा जप्त, दोघांना अटकमालदा : पश्चिम बंगालच्या मालदा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातील दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या दोघांना पाठलाग केला आणि ते रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्याची सूचना रेल्वे पोलीसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी दोघांनाही अटक केली. हे दोघेही बिहारच्या कटिहारचे राहणारे आहेत.अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळबेंगळुरू : बेंगळुरूच्या सीमेवर असलेल्या हॉस्कोट येथे शुक्रवारी सकाळी एका आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा मृतदेह निर्जन स्थळी आढळला. ही मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी सकाळी तिचा शोध घेतला. त्यावेळी तिचा मृतदेह आढळून आला. ही मुलगी आपल्या पालकांसोबत हुबळीहून कामाच्या शोधात आली होती.डीएचएनच्या दोन बंडखोरांना अटकहाफलाँग : आसामच्या दिमा हासाओ जिल्ह्यात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिमा हासाओ नॅशनल आर्मीच्या दोन कुख्यात बंडखोरांना अटक केली. या बंडखोरांजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. या भागात काही बंडखोर दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर व पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.