शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची कैद

बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची कैद
अनंतपूर (आंध्र प्रदेश)- स्थानिक न्यायालयाने आठ वर्षीय बालिकेवर बलात्कारप्रकरणी एका युवकाला १० वर्षे कैदेची शिक्षा ठोठावली आहे. अनंतपूर अतिजलद न्यायालयाच्या न्यायाधीश बी. सुनीता यांनी २० वर्षीय सिद्धार्थ रेड्डीला मंगळवारी दोषी ठरवून त्याला २२,००० रुपये दंडही सुनावला.

रेल्वेत घाण करणाऱ्या प्रवाशांकडून ४३,२०० रुपये दंडवसुली
भोपाळ- भोपाळ विभागातील रेल्वेस्थानके आणि गाड्यांमध्ये घाण करणाऱ्यांविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत जानेवारी महिन्यात घाण करणाऱ्या ४३२ प्रवाशांना पकडण्यात येऊन त्यांच्याकडून ४३,२०० रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने बुधवारी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

काश्मिरात बीएसएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न
जम्मू- जम्मू- काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाने त्याच्या सरकारी रायफलने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी शिपायाचे नाव वीरसिंग असे असून तो मूळ राजस्थानचा रहिवासी आहे. नियंत्रण रेषेजवळील आघाडीच्या चौकीवर बुधवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारागृहातून तीन मोबाईल, दोन सीमकार्ड जप्त
मधेपुरा- बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील एका कारागृहात बुधवारी घालण्यात आलेल्या धाडीत विविध वॉर्डांमधून पोलिसांनी तीन मोबाईल फोन, दोन सिमकार्ड, एक मोबाईल चार्जर आणि इतर बेकायदेशीर साहित्य जप्त केले. पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी यासंदर्भात माहिती देताना गुप्त सूचनेच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.

कोच्ची विमानतळावर ५५ लाखांच्या सोन्याच्या कांब्या जप्त
कोच्ची- सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे जेद्दाह येथून आलेल्या एका प्रवाशाकडून सोन्याच्या सहा कांब्या जप्त केल्या असून त्यांची किंमत ५५ लाख रुपये आहे. हा प्रवाशी त्रिसूर जिल्ह्यातील असून तो कतार एअरवेजच्या विमानाने येथे आला होता.

विद्यार्थिनीवर बलात्कार
दोन तरुणांना अटक
रायपूर- येथील एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी दोन युवकांना अटक केली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील सुपेला पोलीस स्टेशनअंतर्गत कोहका गावात ही घटना घडली.

तेलंगणा व आंध्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक
नवी दिल्ली- तेलंगणा आणि आंध्र विधान परिषदेच्या प्रत्येकी दोन जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने बुधवारी येथे केली. या निवडणुकीसाठीची अधिसूचना १९ फेब्रुवारीला जारी केली जाईल.

काश्मिरातील हिमस्खलनात एक ठार
श्रीनगर- उत्तर काश्मीरचे प्रसिद्ध स्की रिसोर्ट गुलमर्गमध्ये बुधवारी दुपारी झालेल्या हिमस्खलनात एका २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. मृताचे नाव बशीर अहमद बख्शी असे असून तो तंगमार्ग येथील रहिवासी आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली.