राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
उत्तराखंडमधील अपघातात आठ ठार
राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान
उत्तराखंडमधील अपघातात आठ ठारडेहराडून- उत्तराखंडमध्ये टनकपूर- तवाघाट मार्गावर रविवारी एक जीप खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात आठजण ठार तर एक गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये पिथौरागडमध्ये तैनात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. ही जीप हल्द्वानी येथून धारचुलाला जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.न्यायालयात आरोपीची गोळ्या घालून हत्यामुजफ्फरनगर- येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी इ.स.२०११ सालच्या एका प्रकरणातील आरोपीची न्यायालय कक्षातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृताचे नाव विक्की त्यागी असे असून तो गँगस्टार होता. वकिलाच्या वेषात आलेल्या हल्लेखोराला नंतर पोलिसांनी अटक केली. राजस्थानात विविध गुन्ह्यांमध्ये ७२६ जणांना अटकजयपूर- पोलिसांकडून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध राबविण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत गेल्या आठवडाभरात विविध गुन्ह्यातील ७२६ लोकांना अटक करण्यात आली. पोलीस प्रवक्त्याने सोमवारी याबाबत माहिती दिली. काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावश्रीनगर- गुलमर्गसह उत्तर काश्मिरात बहुतांश भागात सोमवारी पुन्हा हिमवर्षाव झाल्याने स्थानिक लोकांना थंडीच्या लाटेपासून किंचित दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध स्की रिसोर्ट गुलमर्गमध्ये चार इंच हिमवर्षावाची नोंद झाली.निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यास १५ महिने कारावासनवी दिल्ली- दिल्लीच्या एका न्यायालयाने २००३ साली निष्काळजीपणे वाहन चालविल्याने एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल आरोपी वाहनचालकाची १५ महिने कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश रविंद्र कौर यांनी हरियाणाचा रहिवासी सुरेश याची न्यायदंडाधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.आदिवासी महिलेचे शोषणमहिला डॉक्टरला अटकफुलबनी (ओडिशा)- गरोदार आदिवासी महिलेला त्रास देऊन तिचे शोषण केल्याच्या आरोपात पोलिसांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला सदर डॉक्टरकडे घरकाम करीत होती.राजस्थानात स्वाईन फ्लूचे १६५ बळीजयपूर- राजस्थानात गेल्या २४ तासात स्वाईन फ्लूने आणखी १२ लोकांचा मृत्यू झाला असून यासोबतच राज्यात या आजाराने मरणाऱ्यांची संख्या १६५ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी ही माहिती देण्यात आली.न्यायालय परिसरात कैद्यावर चाकू हल्लानवादा- बिहारच्या नवादा जिल्ह्यातील न्यायालय परिसरात सोमवारी एका गुंडाने सुनावणीसाठी आणलेल्या कच्चा कैद्यावर चाकूने हल्ला केला. पोलीस अधीक्षक संजयकुमार पांडेय यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, हल्लेखोर दिलीप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.त्या जवानाचा गोळीबार खासगी वैमनस्यातूनगुवाहाटी- तेजपूरमध्ये रविवारी रात्री आसाम रायफल्सच्या एका जवानाने केलेला गोळीबार हा खासगी वैमनस्यातून होता आणि बंडखोरांविरुद्ध मोहिमेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही,असा खुलासा सोमवारी लष्करातर्फे करण्यात आला. या गोळीबारात दोनजण ठार तर एक महिला जखमी झाली होती.