शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महत्वाचे-आतील पान

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

चंद्राबाबू नायडूंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

चंद्राबाबू नायडूंनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. नायडू यांनी एक दिवसापूर्वीच पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत अनेक मुद्यांवर चर्चा केली होती. यात प्रामुख्याने आंध्र प्रदेश पुनर्स्थापना कायद्याशिवाय राज्याला विशेष दर्जा देण्याचाही मुद्दा होता. राष्ट्रपतींची भेट हा शिष्टाचाराचा भाग होता,असे तेदेपा सूत्रांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचा अरुणाचल मुख्यमंत्र्यांना दिलासा
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांना दिलासा देताना त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यासंबंधी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाला बुधवारी स्थगिती दिली. २००६ मध्ये राज्याचे बांधकाम मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

काश्मिरातील चकमकीत दहशतवादी ठार
श्रीनगर: उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. त्याची ओळख अजून पटायची आहे. दहशतवादी दडून बसले असल्याची सूचना मिळाल्यावर जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली होती. सकाळी ७ वाजता चकमक उडाली,अशी माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली.

कोचीजवळ जहाज बुडून तीन ठार
कोची: कोची बंदरात बुधवारी मासे पकडणाऱ्या एका नावेची टक्कर झाल्याने एक जहाज बुडून झालेल्या अपघातात तीन जण मृत्युमुखी पडले. या जहाजात ३० प्रवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तटरक्षक दल, नौसेना आणि पोलिसांनी स्थानिक मासेमारांच्या मदतीने आतापर्यंत सुमारे २० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

माजी सैनिकांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला
नवी दिल्ली: वन रँक वन पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांनी बुधवारी सरकारचा फॉर्म्युला फेटाळल्याने या मुद्यावर बुधवारी कुठलाही तोडगा निघू शकला नाही. उभय पक्षात प्रामुख्याने तीन मुद्यांवर गतिरोध कायम आहे.

बॉम्बस्फोटात एक जखमी
इम्फाल: इम्फाल पूर्व जिल्ह्याच्या चिंगारेल क्षेत्रातील आसाम रायफल्सच्या चौकीजवळ बुधवारी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात एक जण जखमी झाला. सुरक्षा जवानांना लक्ष्य करून अज्ञात दहशतवाद्यांनी हा बॉम्ब पेरला होता. स्फोट झाला त्यावेळी तेथून जात असलेले ५० वर्षीय थॉकचोम कुमार सिंग जखमी झाले,अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

अमरनाथसाठी १४ यात्रेकरूंचा जत्था रवाना
जम्मू: दक्षिण काश्मीरच्या अमरनाथ गुफेत दर्शनासाठी बुधवारी १४ यात्रेकरूंचा नवा जत्था कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात रवाना झाला. आतापर्यंत ३,५१,६०४ भाविकांनी अमरनाथ गुफेतील हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

संपत्तीच्या वादातून जवानाची हत्या
मुजफ्फरनगर: मुजफ्फरनगर जिल्ह्याच्या बोपाडा गावात मंगळवारी रात्री संपत्तीच्या वादावरून एका जवानाची त्याच्या काकाने गोळ्या घालून हत्या केली. मृत जवानाचे नाव कुलदीपसिंग असून आरोपी नेपालसिंग याला अटक करण्यात आली असल्याचे मंसूरपूरचे ठाणेदार चरणसिंग यांनी सांगितले.

बंदुकीच्या धाकावर सव्वालाख लुटले
मोगा(पंजाब): येथील बाघापुराना भागात मंगळवारी दोन सशस्त्र हल्लेखोरांनी बंदुकीच्या धाकावर एका गॅस एजन्सी मालकाजवळील १ लाख २८ हजार रुपये लुटून नेले. पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

श्रीकाकुलममध्ये भूकंपाचे सौम्य धक्के
श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश): आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील काही भागात बुधवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर होती.

नागा संघटनांना करारामुळे तोडग्याची अपेक्षा
कोहिमा: केंद्र आणि एनएससीएन (आयएम)यांच्या दरम्यान अलीकडेच झालेल्या करारामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित नागा मुद्यावर स्वीकारार्ह तोडगा निघेल,अशी अपेक्षा विविध नागा संघटनांनी व्यक्त केली आहे. इसाक मुइवा यांच्या नेतृत्वातील एनएससीएनच्या सामूहिक नेतृत्वाच्या येथे झालेल्या बैठकीत सहभागी सदस्यांनी उपरोक्त आशावाद जाहीर केला.