शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

राष्ट्रीय : महत्त्वाचे

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

राष्ट्रीय-महत्त्वाचे

राष्ट्रीय-महत्त्वाचे
विजेच्या धक्क्याने दोन हत्तींचा मृत्यू
सीधी : मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यातील बघवारी गावात शेतात सिंचनासाठी लावण्यात आलेल्या वीज पंपाच्या जिवंत तारेचा स्पर्श होऊन दोन हत्तींचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री हत्तींचा कळप जंगलातून जात असताना तो मध्य प्रदेशची सीमा ओलांडून छत्तीसगडच्या सीमेत दाखल झाला. तेथे एका शेतात वीज पंप लावला होता. त्याच्या तारेला स्पर्श झाल्याने दोन हत्ती दगावले.
बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील जानसठ येथे बलात्कारपीडित तरुणीने गंगा कालव्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही २१ वर्षीय तरुणी शनिवारी सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेली असताना अंकित नावाच्या नराधमाने तिला बंदुकीचा धाक दाखवून एका निर्जन स्थळी नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीने कालव्यात उडी घेतली. पण लोकांनी तिला वाचविले.
व्हॅलेन्टाईन दिनी पत्नीची निर्घृण हत्या
हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी पत्नी परपुरुषासोबत आपत्तीजनक स्थितीत आढळल्याने संतप्त झालेल्या एका इसमाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करून तिची निघृर्ण हत्या केली. तिचा पती विक्रम सिंग याला ती दुसर्‍या पुरुषासोबत आपत्तीजनक स्थितीत सापडली. त्यामुळे विक्रमने पत्नीला तेथेच पकडले आणि बेदम मारहाण केली, ज्यात तिचा मृत्यू झाला.
मेरठ येथे पत्नीवर ॲसिड हल्ला
मेरठ : उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे दुसर्‍या पुरुषासोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नीच्या चेहर्‍यावर ॲसिड फेकले. वकील असे ॲसिड हल्ला करणार्‍या पतीचे नाव आहे. तो पेंटिंगचे काम करतो. पत्नीचे शेजारच्या इरफानशी संबंध असल्याचा त्याला संशय होता. यावरून त्याने पत्नीला फटकारले होते. परंतु तरीही ती इरफानला भेटत राहिली. यामुळे संतप्त झालेल्या वकीलने तिच्यावर ॲसिड फेकले.
कार-बस अपघातात चार जण ठार
कुरुक्षेत्र : कुरुक्षेत्र-पेहोवा मार्गावर रविवारी सकाळी एक कार आणि बस यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन त्यात कारमधील चारजण जागीच ठार आणि एक जखमी झाला. मृतांत एका बालिकेचा समावेश आहे. लोकार माजरा गावाजवळ हा अपघात घडला.
उत्तर प्रदेशात दंगल, एक जण ठार
आजमगड : उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्याच्या हरिहरपूर गावात दोन गटांत उडालेल्या संघर्षात एक जण ठार आणि दोघे जखमी झाले. जमिनीच्या वादातून ही दंगल घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही गटांच्या लोकांनी परस्परांवर लाठ्या काठ्या आणि तलवारीने हल्ला केला. रामनाथ असे संघर्षात मारला गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.