शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महत्त्वाचे

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

मोटारसायकल अपघातात रेल्वे पोलिसाचा मृत्यू

मोटारसायकल अपघातात रेल्वे पोलिसाचा मृत्यू
बागपत : मोटारसायकल अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्ड्यात पडल्याने मोटारसायकलस्वार रेल्वे पोलिसाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील हाजीपूर येथे ही घटना घडली. बृजेंद्र सिंग (४१) असे मृताचे नाव आहे. बृजेंद्र सिंगचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
बनावट चकमकप्रकरणी सीबीआयला नोटीस
नवी दिल्ली : डेहरादून येथे २००९ मध्ये घडलेल्या बनावट चकमकीच्या संदर्भात दोषी ठरविण्यात आलेल्या उत्तराखंड पोलीस दलाच्या १७ पोलिसांपैकी एका पोलिसाने अंतरिम जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावरून दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस जारी केली. या चकमकीत एमबीएचे शिक्षण घेत असलेला २२ वर्षीय विद्यार्थी रणबीर सिंग हा मारला गेला होता. विकास चंद्र बलुनी या पोलिसाने बहिणीच्या विवाहासाठी अंतरिम जामीन देण्याची विनंती केली आहे.
मिश्रा हत्याकांड : आरोपींच्या
याचिकेवरून सीबीआयला नोटीस
नवी दिल्ली : माजी रेल्वेमंत्री एल. एन. मिश्रा यांच्या हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन आरोपींच्या जामीन याचिकेवरून दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला नोटीस जारी केली. ४० वर्षांपूर्वी मिश्रा यांची बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती. न्या. जी. एस. सिस्तानी व न्या. संगीता सहगल यांच्या पीठाने सुदेवानंद अवधूत व रंजन द्विवेदी या दोघांच्या याचिकेवरून ही नोटीस जारी केली.
इंदूरमध्ये अपक्ष
उमेदवारावर गोळीबार
इंदूर : इंदूर नगरपालिकेच्या शनिवारी होऊ घातलेल्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राजकीमार टेटवाल (३८) यांच्यावर शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात टेटवाल गंभीर जखमी झाले आहेत. टेटवाल हे वॉर्ड क्रमांक ४४ मध्ये नगरसेवकपदासाठी उभे आहेत. दोन अज्ञात हल्लेखोरांनी जगजीवनराम येथील त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयात घुसून गोळीबार केला आणि नंतर पसार झाले. टेटवाल यांच्या खांद्याला गोळी लागली आहे.
निती आयोग : सारस्वत यांनी
पदभार सांभाळला
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) माजी महासंचालक व्ही. के. सारस्वत यांनी शुक्रवारी निती आयोगाचे पूर्णकालीन सदस्यपदाची सूत्रे हाती घेतली. सरकारने सारस्वत आणि अर्थतज्ज्ञ बिबेक ओबेराय यांची आयोगाचे पूर्णकालीन सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. सारस्वत यांना १९९८ मध्ये पद्मश्री आणि २०१३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हरियाणात ४९ पोलीस
अधिकाऱ्यांची बदली
चंदीगड : हरियाणा सरकारने पोलीस दलात मोठा फेरबदल करीत शुक्रवारी ४९ पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली. बदली करण्यात आलेले सर्व पोलीस अधिकारी हे उपअधीक्षक स्तरावरील आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या सूत्रांनी दिली.
आसाममध्ये गेंडा सुरक्षा
दल स्थापन करणार
गुवाहाटी : गेंड्यांच्या सुरक्षेसाठी १२०० कर्मचारी असलेल्या एका गेंडा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. या संदर्भातील एक प्रस्ताव याआधीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, वन व जलवायू परिवर्तन मंत्र्यांना पाठविण्यात आलेला आहे, असे गोगोई यांनी सांगितले. राज्यात गेंड्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात आहे, हे येथे उल्लेखनीय.
स्वच्छ भारत मिशनवर
टपाल तिकीट
नवी दिल्ली : दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, शहर विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू आणि ग्रामीण विकासमंत्री बीरेंद्र सिंग यांच्या हस्ते शुक्रवारी स्वच्छ भारत मिशनवरील एका टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. हे टपाल तिकीट लोकांच्या भागीदारीतून डिझाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ते मुलांनी डिझाईन केले आहे, असे प्रसाद यांनी यावेळी सांगितले.
काळा पैसा : मोईन कुरेशीला
न्यायालयाचा समन्स
नवी दिल्ली : वादग्रस्त व्यवसायी मोईन कुरेशी यांना शुक्रवारी काळा पैसाप्रकरणी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी देवेंद्र कुमार शर्मा यांनी आरोपी म्हणून समन्स जारी केला आहे. २० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आयकर विभागाने कुरेशीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. या समन्सनुसार कुरेशी यांना २ मार्चपर्यंत न्यायालयात हजर व्हायचे आहे.