राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
समुद्रात नाव बुडाली : अभियंता बेपत्ता
राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान
समुद्रात नाव बुडाली : अभियंता बेपत्तानागपट्टनम-येथील किनारपट्टीवर तपासकामात तैनात असलेल्या जहाजाकरिता ६० टन आवश्यक वस्तू व डिझेल घेऊन जाणारे एक जहाज क्षतिग्रस्त होऊन समुद्रात बुडाले. या जहाजावरील सात कामगारांना वाचविण्यात आले असून जहाजाचे प्रभारी अभियंता रंजीत सिंग हे बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेणे सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.------------------------------भारत-म्यानमार सीमेवर शक्तिशाली बॉम्ब आढळलाइम्फाळ- दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेला एक शक्तिशाली बॉम्ब मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातील आसाम रायफल्सच्या चौकीजवळ आढळून आला आहे. बटालियनच्या एका गस्त पथकाला हा तीन किलोचा बॉम्ब आढळून आला. त्याला निष्क्रिय करण्यात आले आहे. ----------------------------धुक्यामुळे ट्रक नाल्यात पडला : सहा ठारजालौन- दाट धुक्यामुळे रस्ता नीट न दिसल्याने एक ट्रक नाल्यात पडून सहा जण ठार झाले तर ३४ जण जखमी झाले आहेत. हमीरपूरच्या मदौहा भागात धार्मिक स्थळाला भेट देऊन परत जाणाऱ्या या भाविकांवर काळाने अचानक झडप घातली. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.------------------------------------ सरपंचाची गोळी झाडून हत्याश्रीनगर- संदिग्ध दहशतवाद्यांनी बारामुला जिल्ह्यातल्या सोपोर येथे शनिवारी एका सरपंचाची गोळी झाडून हत्या केली. बोमई येथील गुलाम अहमद भट्ट या व्यक्तीवर काही बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.-----------------------------धर्मांतरासाठी लाच देताना दोन युवक अटकेतरायबरेली- येथील लालगंज भागात धर्म परिवर्तन करण्यासाठी रोख रकमेची लाच देण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बलराम व प्रदीप या दोघांवर पैशाच्या जोरावर धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.------------------------------------कोट्यवधींच्या करचोरीचा छडा मुजफ्फरनगर-आयकर विभागाने १० होजिअरी प्रतिष्ठानांवर धाड टाकून कोट्यवधींच्या करचोरीचा छडा लावला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येथील १० ठिकाणी धाडी टाकून कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानुसार कोट्यवधींचा कर बुडविल्याचे प्रकरण समोर आले आहे. पुढील तपास सुरू आहे.------------------------------------पोलीस विभागाच्या विकासाकरिता ५५ कोटींचा प्रस्तावडेहराडून-२०१६ साली हरिद्वार येथे होणाऱ्या अर्ध कुंभ मेळाव्याकरिता पोलीस विभागाला विकसित करण्याच्या दृष्टीने ५५ कोटींचा प्रस्ताव केंद्राला पाठविला जाणार आहे.मुख्य सचिव एन. रविशंकर यांच्या अध्यक्षतेतील बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ------------------------------------हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेपमेदिनीनगर- दोन वर्षे जुन्या अपहरण व हत्येच्या प्रकरणी येथील एका स्थानिक न्यायालयाने चौघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील राजवाडी गावातील बेपत्ता झालेल्या रणधीर कुमारचा मृतदेह तीन दिवसांनी आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. ------------------------------------अश्लील एसएमएस बनवून पाच लाख लुटलेमेरठ- सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा अश्लील एसएमएस बनवून तो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पाच लाखांची रक्कम वसूल केल्याची घटना येथे घडली. एका हेल्थ क्लबमध्ये सदस्य असलेल्या या कर्मचाऱ्याला गुंगीचे औषध पाजून त्याचे अश्लील चित्रण केले होते. त्या आधारे या टोळीने पुन्हा पैसे मागितले तेव्हा त्याने ही तक्रार पोलिसात नोंदवली.------------------------------------माओवाद्यांनी केली गावकऱ्याची हत्यामलकानगिरी-पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी एका गावकऱ्याची हत्या केली. ३२ वर्षांचा हा इसम सायकल दुरुस्तीचे दुकान चालवीत होता. माओवाद्यांच्या एका गटाने शुक्रवारी रात्री त्याला आपल्यासोबत नेले होते. काही वेळाने त्याचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.