शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

कूपवाडात दहशतवादी ठार

कूपवाडात दहशतवादी ठार
श्रीनगर- कूपवाडा जिल्ह्यात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी गुरुवारी ठार झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी आल्याची सूचना मिळताच सुरक्षा जवानांनी शोध मोहीम सुरू केली. त्यात कूपवाडा जिल्ह्याच्या सालकोट भागात दहशतवादी व जवानांसोबत चकमक उडाली. यात एक दहशतवादी ठार झाला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
------------------------------------------

दोन कोटींची सिगारेट लुटली
नवादा- बिहारच्या नवादा जिल्ह्यात असलेल्या अकबरपुरा येथे लुटारूंनी एका ट्रक चालकाला बंदी बनवून ट्रकमधील दोन कोटी रुपये किमंतीची सिगारेट लंपास केली. ट्रकमध्ये सिगारेटची खोकी घेऊन जात असलेल्या या ट्रकला फतेहपूरजवळ अडविण्यात आले होते. या ट्रक चालकाला मारहाण करून ट्रकसह सोडून देण्यात आले. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.
------------------------------------------------
धर्मांतर प्रकरणाच्या तपासाचे आदेश
बहराईच- येथील जिल्हा प्रशासनाने धर्मांतराच्या कथित प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी सत्येंद्र सिंग यांनी ही प्रकरणे कमलापुरी गावातील असल्याचे सांगून कुणीतरी पोलिसांसोबत खोडसाळपणा केला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. येथील दलितबहुल भागात धर्मांतर केले गेल्याची चर्चा केली जात होती.
---------------------------------------------

१२ हजाराहून अधिक न्यायालये संगणकीकृत
नवी दिल्ली- नोव्हेंबर २०१४ पर्यंत देशातील १२,३२३ न्यायालये संगणकीकृत झाली असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली. विधी व न्याय मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी, प्रलंबित प्रकरणांचा निकाल लवकर लावण्यासाठी न्यायालयात संगणक प्रणाली लावण्यात आली असल्याचे सांगितले.
---------------------------------------

पाच नक्षलवाद्यांचे समर्पण
रायपूर-छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात पाच नक्षल्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर बक्षीस घोषित करण्यात आले होते. जिल्हा मुख्यालयात गुरुवारी राजाराम कश्यप, बरसा सुखराम, धनरीराम, लखू व रामूराम यांनी आत्मसमर्पण केले. नक्षल्यांच्या अन्यायाला कंटाळल्याने नक्षलवाद सोडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
------------------------------------------