शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याने कार्यकर्त्याला लाथ मारली

By admin | Updated: September 3, 2014 19:45 IST

नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलम वानी यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारण्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
गांदरबल (काश्मीर), दि. ३ -  नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलम वानी यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारण्याची घटना घडली आहे. त्यांच्या या कृतीमुळे काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला अडचणीत येऊ शकतात. वानी हे अब्दुल्लां यांचे निकटवर्ती आहेत. सभेतील घोषणाबाजीने संताप अनावर झाल्याने वानी यांचा तोल गेला व त्यांनी एका कार्यकर्त्यावर आपला राग काढला. वानी यांनी मंचावरून खाली उतरून एका कार्यकर्त्याला लाथ मारली परंतु लगेचच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थोपवले. 
या घटनेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या भीमा गांदरबल येथील कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेख इशफाक जब्बार यांच्या समर्थकांनी पक्षाच्या विरोधात घोषणा देण्यास सुरवात केली. जब्बार यांना निवडणुकीचे तिकीट देण्याचे आश्वासन पक्षाने दिले होते. परंतू आता पक्ष आपल्या आश्वासनापासून फारकत घेत असल्याने जब्बार यांच्या पाठिराख्यांनी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी जब्बार यांच्या समर्थकांचा विरोध करत त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली. तसेच गांदरबल येथून ओमर अब्दुल्ला यांनीच निवडणुक लढवावी अशी मागणी केली. जब्बार यांना तिकिट देऊन आपण पराभवाला आमंत्रण देत असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले. या वादाचे रुपांतर हाणामारीत होण्याची शक्यता लक्षात घेत पक्षाच्या नेत्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. यापूर्वीही एका व्यक्तीने मुख्यमंत्री अब्दुल्ला यांचे आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता काश्मीरचे उच्च शिक्षामंत्री मोहम्मद अकबर लोन यांनी त्या व्यक्तीला अपमानित केले होते.