शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही 'या' गावात पोहोचली नाही वीज, जाणून घ्या पूर्ण कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 12:00 IST

स्वातंत्र्याला 70हून अधिक वर्षं लोटली, तरीही देशातील या गावात अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही.

त्रिशूलीः स्वातंत्र्याला 70हून अधिक वर्षं लोटली, तरीही देशातील या गावात अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही. छत्तीसगडमधल्या त्रिशूली गावात अद्यापही वीज पोहोचलेली नाही. त्रिशूली गावात जवळपास 100 घरं आहेत. परंतु त्या गावात प्रशासनाला आजपर्यंत वीज पोहोचवता आलेली नाही. स्थानिकांनी आता कलेक्टर यांना पत्र लिहून वीज पुरवण्याची मागणी केली आहे.पत्रात गावकरी लिहितात, आजपर्यंत आमच्या गावात वीज पोहोचू शकलेली नाही. इथे जवळपास 100हून अधिक घरं आहेत. आमची मुलं वीज नसल्यानं सूर्यास्त झाल्यानंतर अभ्यास करत नाहीत. त्यानंतर बलरामपूरचे जिल्हाधिकारी संजीव कुमार झा म्हणाले, वीज अद्यापपर्यंत पोहोचलेली नसलेल्या गावांत सर्व्हे करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माजरा-टोला विद्युतीकरण योजनेंतर्गत त्रिशूली गावात वीज पोहोचवणार आहेत. तसेच त्रिशूलीसह इतर गावांमध्येही वीज पोहोचवली जाईल.छत्तीसगडमधील 122 गावांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नसल्याची माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आली होती. बस्तरमधील ज्या बामदई गावातून मुख्यमंत्र्यांनी वीजपुरवठ्याचा उत्सव सुरू केला तिथेच अंधार आहे. तर गेल्या वर्षी मोदी सरकारनं देशातल्या सर्व गावांत वीज पोहोचवल्याचा दावा केला होता. देशात 100% वीज पुरवठा झाला आहे. सरकारने एक हजार दिवसांत 18 हजार 452 गावांमध्ये वीज पोहोचवली आहे, असा दावा मोदी सरकारनं केला होता. परंतु अद्यापही काही अशी गावं आहेत, ज्या गावांत वीज आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तर दुसरीकडे डेटा एजन्सी ब्लूमबर्ग यांनी सरकारी आकडेवारीच्या हवाल्याने म्हटले होते की, 2014नंतर 4 वर्षांमध्ये वीजपुरवठा पोहोचवलेल्या 19,727 गावांपैकी फक्त 8% गावांमधील घरातच वीज पोहोचली आहे. उर्वरित 92% गावांतील बहुतांश घरे ही अद्याप अंधारात आहेत. यात मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार, पंजाब आणि महाराष्ट्रातील गावांचा समावेश आहे.   

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड