शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू महासभेने उभारला नथुराम गोडसेचा पुतळा

By admin | Updated: October 3, 2016 04:09 IST

गांधींना त्यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली जात असताना अ.भा. हिंदू महासभेने हा दिवस ‘धिक्कार दिवस’ म्हणून पाळला

मेरठ : संपूर्ण देशात रविवारी महात्मा गांधींना त्यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली जात असताना अ.भा. हिंदू महासभेने हा दिवस ‘धिक्कार दिवस’ म्हणून पाळला व त्यांच्या येथील कार्यालयात गांधीजींचा खुनी नथुराम गोडसे याच्या पुतळ््याचे अनावरण केले.या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या येथील शारदा रोडवरील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास फारच थोडे लोक उपस्थित होते. हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पं.अशोक शर्मा यांनी नथुराम गोडसेच्या पुतळ््याचे अनावरण केले. त्याआधी विधिवत पूजा करण्यात आली व अनावरणानंतर पुतळ््याला हार घालून शाल प्रदान करण्यात आली व होमहवनही करण्यात आले. अनावरणानंतर केलेल्या भाषणात पं. शर्मा यांनी नथुराम गोडसे हाच खरा ‘राष्ट्रपुरुष’ असल्याचे जाहीर केले व गांधींऐवजी गोडसेचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. इतकी वर्षे आपण गोडसेचे तत्वज्ञान अनुसरले असते तर उरी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून धडा शिकविण्याची वेळच आली नसती, असा दावाही त्यांनी केला. भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका करताना शर्मा म्हणाले की, भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर सावकरांप्रमाणेच गोडसेच्या योगदानाचेही ऋण मानेल, अशी अपेक्षा होती. परंतु राजकीय संधीसाधूपणा करायचा असल्याने गोडसेचा मार्ग स्वीकरणे त्यांच्या पचनी पडले नाही, असे दिसते.हाच मुद्दा सविस्तर मांडताना ७२ वर्षांचे पंडित शर्मा म्हणाले की, सावरकर आणि गोडसे हे एकाच राजकीय विचारधारेचे प्रतिनिधी असल्याने भाजपा या दोघांमध्ये दुजाभाव करू शकत नाही. पण संसद भवनातील सावरकरांच्या फोटोला दरवर्षी हार घालायचे व गोडसेकडे ढुंकूनही पाहायचे नाही, हा आपमतलबीपणा आहे. हिंदू महासभेने दोन वर्षांपूर्वी गोडसेचा पुतळा उभारण्यासाठी चबुतराही बांधला होता. (वृत्तसंस्था)>५० किलोचा दोन फुटी पुतळानथुराम गोडसेचा हा पुतळा फक्त चेहरा व छातीपर्यंतचा असून त्याची उंची दोन फूट आहे. हिंदू महासभेचे उत्तर प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र वर्मा यांनी हा पुतळा जयपूरहून बनवून आणला. अशा ‘महान’ कामासाठी इतरांपुढे हात पसरण्याचा संकोच वाटल्याने पुतळ््यासाठी सर्व ४५ हजार रुपयांचा खर्च आपण स्वत:च केला, असे वर्मा यांनी सांगितले.