नाशिक- सीडी- फोटो ओळी
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
०६पीएचजेएल ६७- कुंभमेळ्यासाठी सध्या नाशिक शहरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम जोरात सुरू आहे. रामकुंडावर पुरोहित संघाचे कथित अनधिकृत शेड (कार्यालय) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटविण्यास प्रारंभ केल्यानंतर पुरोहितांनी त्यास विरोध केला. त्यामुळे पुरोहित संघ आणि बंदोबस्तास असलेल्या पोलिसांमध्ये अशी धुमश्चक्री उडाली. खासगी जागेतील आणि वाहतुकीस अडथळा न ठरणारे शेड हटविल्याचा आरोप करीत पुरोहित संघाने बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, खासगी जागेतील हे शेड असल्यास ते पुन्हा बांधू देण्याची परवानगी दिली जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्यानंतरच पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले उपोषण स्थगित करण्यात आले. (छायाचित्र- नीलेश तांबे)