शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त बोर्डेंची तडकाफडकी बदली महापालिका क्षेत्रात खळबळ : नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे येणार

By admin | Updated: July 3, 2016 00:32 IST

जळगाव : मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांची अवघ्या १६ दिवसात येथून तडकाफडकी बदली करण्यात आल्याने मनपा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदर्भातील आदेश आज येथे प्राप्त झाले. त्यांच्या जागी नाशिक मनपातील अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे हे जळगाव महापालिकेत येत आहेत. प्रारंभापासून जळगावसाठी जीवन सोनवणे यांच्याच नावाची चर्चा होती मात्र किशोर बोर्डे यांची वर्णी लागली होती.

जळगाव : मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांची अवघ्या १६ दिवसात येथून तडकाफडकी बदली करण्यात आल्याने मनपा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदर्भातील आदेश आज येथे प्राप्त झाले. त्यांच्या जागी नाशिक मनपातील अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे हे जळगाव महापालिकेत येत आहेत. प्रारंभापासून जळगावसाठी जीवन सोनवणे यांच्याच नावाची चर्चा होती मात्र किशोर बोर्डे यांची वर्णी लागली होती.
आयुक्त संजय कापडणीस यांची गेल्या १६ जून रोजी बदली होऊन त्यांच्या जागी मालेगाव येथे आयुक्त म्हणून काम केलेले परंतु महिनाभरापूर्वीच तेथे नवीन आयुक्त आल्याने कार्यभार नसलेले किशोर बोर्डे यांची जळगाव येथे बदली झाली होती. १७ जून रोजी बोर्डे यांनी जळगावी येऊन मनपा आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला होता.
नाशिकला झाली बदली
किशोर बोर्डे यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात येत असल्याचे आदेश नगर विकास विभागाचे उप सचिव जे.एन. पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्या जागी नाशिक महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांची बदली करण्यात येत असल्याचेही या आदेशात नमूद आहे.
सोनवणे सोमवारी येणार
नवे आयुक्त जीवन सोनवणे हे सोमवारी येथे रूजू होणार असल्याचे सूत्रांनी सांगिलते. बदलीचे आदेश मिळाल्यानंतर बोर्डे हे शनिवारी दुपारीच नाशिकला रवाना झाले. तेदेखील सोमवारी जळगावी सोनवणे यांना कार्यभार सोपविण्यासाठी येणार आहेत.
कामकाजात सावध पवित्रा
१७ पासून बोर्डे यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर प्रारंभापासून त्यांचा पवित्रा हा सावधच होता. त्यांनी काही बैठका घेतल्या मात्र कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाला या १६ दिवसात हात घातला नव्हता. त्यामुळे त्यांचा कामकाजातील पवित्रा पहिल्या दिवसापासून सावधच होता.
---
केवळ भेटीगाठी व काही ठिकाणी भेट
बोर्डे यांनी एका स्थायी समितीचे कामकाज पाहीले. तसेच अधिकार्‍यांच्या विविध विषयांवर चर्चा केल्या. महापौर नितीन ल‹ा यांच्या समवेत त्यांची शुक्रवारी तब्बल दोन तास बैठक झाली. शहरातील मार्केटच्या प्रलंबित विषयावर या दोहोंची चर्चा झाली. मात्र कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत ते पोहोचले नव्हते.
-------