शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नशीबवानाला मिळाली मुलगी

By admin | Updated: June 7, 2017 00:25 IST

कितीही चांगले काम केले तरी जे मिळायचे तेच मिळते, असे लोक म्हणतात

कितीही चांगले काम केले तरी जे मिळायचे तेच मिळते, असे लोक म्हणतात; परंतु या रिक्षावाल्याची कथा वाचून तुम्हीही म्हणाल की, चांगले काम कधी वाया जात नाही. बबलू शेख हे ३० वर्षांपासून रिक्षा चालवतात. एक तरुणी रेल्वेखाली आत्महत्या करायला निघाली असताना तिला त्यांनी वाचवले. ती त्यांना म्हणाली मला कधी पुन्हा भेटू नका. त्यांनीही कधी ही बाब कोणाला सांगितली नाही. आठ वर्षांनंतर बबलू रुग्णालयात वेदना सहन करीत असताना तीच तरुणी एका कथेसह तेथे आली व तिने बबलूच्या सगळ्या वेदना पळवल्या.फेसबुक युझर जीएमबी आकाशने ही अनोखी कथा शेअर केली व तिला हजारो लोकांनीही शेअर केले. बबलूंनी सांगितले की, त्यांना मुलीची खूप हौस होती; परंतु त्यांना तिन्ही मुलेच होती. ते बायकोला म्हणायचे की, मुलगी नशीबवानालाच मिळते. आपल्या नशिबात मुलगी नाही.बबलूंनी सांगितले की, एकदा एकाने मला त्याच्या तरुण मुलीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी माझी रिक्षा मागवली. थोड्या अंतरावर मला तिचा रडण्याचा आवाज ऐकू आला. मी तिला विचारले, तर तिने मला झिडकारले. मागे बघू नका, असेही सांगितले. नंतर तिने रिक्षा थांबवली व कोणाशी तरी फोनवर बोलू लागली. ती सतत रडत व ओरडत होती. त्यावरून मला अंदाज आला की, तिला घरातून पळून जायचे आहे. मला राग आला व बरे झाले आपल्याला मुलगी नाही ते, असेही वाटले. तिने अचानक रिक्षातून उडी मारली व रेल्वेरुळांकडे धावली. बहुधा तिला आत्महत्या करायची असावी. मी म्हणालो जाऊ द्या. आपल्याला काय करायचे आहे? तिच्या मागे धावत मी रेल्वे रुळांवर पोहोचलो. मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला; परंतु तिने मला झिडकारले, बेवकूफ म्हणाली. ती जोरजोरात रडत होती. मी तिला रडू दिले म्हणजे ती शांत होईल. निर्मनुष्य भागात तिला एकटीला सोडून जायची माझी तयारी नव्हती. तिच्यासाठी मी काही तास तेथेच थांबलो. नंतर पाऊस सुरू झाला. ही घटना आठ वर्षांपूर्वीची.’एकदा मला रिक्षा चालवताना अपघात झाला. रुग्णालयात मी शुद्धीवर आल्यावर एक तरुणी माझ्या जवळ उभी होती. तिने माझा हात धरून मला विचारले की, मला भेटायला माझ्या घरी का आला नाहीत? ही तरुणी कोण हे मला आठवत नव्हते. तिने मला मोठ्या डॉक्टरकडे नेले व हे माझे वडील आहेत, असे सांगितले. यांनी त्यावेळी मला आधार दिला नसता, तर मी डॉक्टर बनले नसते, असे ती म्हणाल्यावर माझ्या डोळ्यांत पाणी आले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. काही वर्षांपूर्वी भेटलेली ही मुलगी आज डॉक्टर बनून मला मिळाली होती, असे बबलूंनी सांगितले.