शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘व्यापमं’पेक्षाही नर्मदा घोटाळा मोठा - सिंघवी

By admin | Updated: October 20, 2016 04:42 IST

व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) कथित घोटाळ््यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सरकार नव्या घोटाळ््यात अडकणार असल्याचे दिसत आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) कथित घोटाळ््यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सरकार नव्या घोटाळ््यात अडकणार असल्याचे दिसत आहे. नर्मदा विस्थापितांसाठी असलेली मदतीची रक्कम राज्य सरकारमधील लोकांच्या मदतीने लुटल्या गेल्याचा उल्लेख एस. एस. झा आयोगाने अहवालात केला असून, तो अहवाल प्रसिद्ध होऊ नये म्हणून राज्य सरकार होईल तेवढा प्रयत्न केला होता. हा अहवाल जाहीर होऊ नये यासाठी सरकार उच्च न्यायालयाचीही पायरी चढले. परंतु न्यायालयाने झा आयोगाचा अहवाल प्रकाशित करून तो जाहीर करण्याचा आदेश देऊन सरकारला झटका दिला. अहवालात जे सत्य समोर आले त्याने डोळे विस्फारतात. अहवालाने म्हटले की, नर्मदाच्या विस्थापितांचे पुनर्वसन आणि त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध करण्यात आलेले हजारो कोटी रुपये सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या मदतीने लुटले गेले. हा मुद्दा काँग्रेसने मोदी सरकार आणि भाजपच्या विरोधात मोठे राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘व्यापमं’पेक्षाही नर्मदा घोटाळा फार मोठा असल्याचे व त्यात भाजप नखशिखांत बुडाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी पुनर्वसन आणि मदतीशी ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना हे पैसे वाटले गेले, असा आरोप केला. >व्यक्तीच अस्तित्वात नाही तर मग पैसा गेला कुठे?ज्याला पैसा दिला गेला ती व्यक्तीच अस्तित्वात नाही तर मग पैसा गेला कुठे, असा प्रश्न सिंघवी यांनी विचारला. बनावट कागदपत्रे कोणी तयार केली? आमचे सरकार प्रामाणिक असल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आयोगाबद्दल अजून काहीच का बोलत नाहीत?, असे ते म्हणाले.