शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

भूसंपादनावर नरेंद्र मोदींची नरमाई

By admin | Updated: February 28, 2015 05:29 IST

वादग्रस्त भूसंपादन विधेयकापासून माघार नाहीच अशी भाषा सरकारकडून अगदी कालपर्यंत केली जात असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वादग्रस्त भूसंपादन विधेयकापासून माघार नाहीच अशी भाषा सरकारकडून अगदी कालपर्यंत केली जात असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरमाई दाखवत प्रस्तावित विधेयकात सुधारणा करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले व विरोधकांनी हा राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा न बनविता समर्थन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना मोदी म्हणाले की, अहंकार बाजूला ठेवा. आम्ही जे केले त्यापेक्षा चांगले असूच शकत नाही, अशी भाषा नको. काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने २०१३ मध्ये जमीन कायदा पारित केला तेव्हा आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा भिडवत उभे ठाकले होते. तुम्हाला राजकीय लाभ घ्यायचा हे आम्हाला माहीत होते. तरीही आम्ही तुमच्यासोबत होतो, असे सांगत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य बनविले. संपुआ सरकारने पारित केलेला जमीन कायदा शेतकऱ्यांच्या हिताला बाधक असल्याचे सांगत सर्व मुख्यमंत्र्यांनी त्यात बदल सुचविले होते. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी या कायद्याबाबत शेतकऱ्यांचा विचार करा, सिंचनाचा, पायाभूत सुविधांचा विचार करा अशी मागणी केली होती. सांघिक संरचनेत मुख्यमंत्र्याचा आवाज न ऐकण्याइतपत आम्ही मग्रूर नाही. आपण शेतकऱ्यांचे हित डावलू शकतो काय? चूक सुधारणे ही आपली जबाबदारी नाही काय? तुम्ही जे केले ते आम्ही नाकारत नाही. उगाच राजकारण करू नका, असे काँग्रेसला सुनावले. ‘मनरेगा’ हे अपयशाचे स्मारक !७० मिनिटांच्या भाषणात मोदींनी मनरेगा, काळा पैसा, भ्रष्टाचार आणि कोळसा खाणपट्टे वाटप यासारख्या मुद्यांसह सांघिकतेला बळकटी देण्यासाठी राज्यांचे सबलीकरण, स्वच्छता मोहीम आणि जनधन योजनेचा उल्लेख केला. मनरेगा योजना बंद पडल्याची अफवा पसरवली जात आहे. काही क्षेत्रात माझ्याकडे हुशारी नाही, मात्र किमान राजकीय हुशारी तरी आहे. ही योजना बंद कशी पाडू? मनरेगा हे अपयशाचे स्मारकच आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसची टर उडविली. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली तरी गरिबांना खड्डे खोदायला भाग पाडले जावे, असे तुम्हाला वाटते. तुम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या, त्याच्या पाऊलखुणा उरल्या आहेत. हे लोकांना कळायला हवे, असे मोदी उपरोधिकपणे म्हणाले.