पुणे : केंद्र सरकार येत्या १९ फेब्रुवारीला केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी ‘जमीन आरोग्य पत्रिका’ (सॉईल हेल्थ कार्ड) योजना सुरू करीत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी दीड वाजता ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कॉन्फरन्ससाठी शेतक-यांना प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात निमंत्रित करण्याचे काम राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयाकडून सुरू आहे. राज्याचा कृषी विभाग सध्या गावनिहाय मातीपरीक्षण करून प्रत्येक गावात सुपिकता निर्देशांक फलक लावतो. यानुसार त्या गावातील शेतकऱ्यांना पिकांबाबत नियोजन करता येते. केंद्र सरकारने ही योजना व्यापक करीत आता प्रत्येक शेतकऱ्यालाच ‘जमीन आरोग्य पत्रिका’ देण्याचे ठरविले आहे. यामध्ये बागायती क्षेत्रात प्रत्येक अडीच हेक्टर जमिनीमागे तर जिरायत क्षेत्रात प्रत्येकी दहा हेक्टर जमिनीमागे एक नमुना घेऊन मातीपरीक्षण केले जाणार आहे.
नरेंद्र मोदींचा आता शेतक-यांशी आॅनलाईन संवाद
By admin | Updated: February 13, 2015 01:15 IST