शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वांत लांब बोगद्याचे नरेंद्र मोदी करणार उद्‍घाटन

By admin | Updated: March 19, 2017 17:59 IST

भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये आकाराला येत आहे.

ऑनलाइन लोकमतचेनानी, दि. 19 - भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये आकाराला येत आहे. जम्मू-काश्मीरमधल्या राष्ट्रीय महामार्गावर कंपनीनं ट्रायल(चाचणी) घेतल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करण्याची शक्यता आहे. हा भारतातला सर्वात मोठा बोगदा असून, जम्मू-काश्मीरला जोडण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होणार आहे. या बोगद्यामुळे जम्मूहून काश्मीर अडीच तासांत गाठता येणार आहे. 9 मार्च आणि 15 मार्चला पहिले ट्रायल घेण्‍यात आले आहे. बर्फवृष्‍टी आणि हिमस्खलनामुळे वारंवार ठप्प होणा-या राष्‍ट्रीय महामार्ग 1-अची या बोगद्यामुळे वाहतुकीची समस्या मिटणार आहे. सुरक्षेच्‍या कारणास्तव प्रत्‍येक 75 मीटरवर 124 सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतुकीवर नजर ठेवण्‍यासाठी एक सेंट्रलाइज्‍ड रूमदेखील तयार करण्यात आली आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक जे. एस. राठोड यांनी दिली आहे. बोगद्यामध्‍ये अनेक टेलिकॉम कंपन्‍यांचे नेटवर्क आणि मनोरंजनासाठी एफएम सिग्‍नलही मिळावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 9.2 किलोमीटर खोलवर सुरूंग लावून हा बोगदा बनवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या जोडणा-या 286 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचाच हा बोगदा एक भाग आहे. 23 मे 2011ला हिमालयाच्या पर्वतरांगामधून या बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या बोगद्यावर जवळपास 3720 कोटी रुपये खर्च आला आहे. या बोगद्यामुळे चेनानी ते नैशारी दरम्यानचं 41 किलोमीटरच अंतर अवघ्या 10.9 किलोमीटरमध्ये कापता येणार आहे.