शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वाधिक परफोर्मिंग नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी दुसरे

By admin | Updated: December 19, 2014 12:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आगेकूच सुरुच असून जपानमधील एका रिसर्च कंपनीच्या सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे सर्वाधिक परफोर्मिंग नेते ठरले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आगेकूच सुरुच असून जपानमधील एका रिसर्च कंपनीच्या सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे सर्वाधिक परफोर्मिंग नेते ठरले आहेत. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत. 
टोकियोतील एका रिसर्च कंपनीने जगातील टॉप ३० परफोर्मिंग नेत्यांची यादी तयार केली आहे. या यादीत ३० देशांमधील सुमारे २६ हजार जणांची मतं जाणून घेण्यात आली. यात आशियातील १२,  आफ्रिका आणि अमेरिका खंडातील प्रत्येकी चार, युरोपमधील आठ, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपंग १० पैकी ७.५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर मोदी ७.३ गुणांसह दुस-या तर जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मार्केल ७.२ गुणांसह तिस-या स्थानावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ६.६गुणांसह चौथ्या, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन ६.५ गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन ६ गुणांसह सर्वात तळाला आहेत. 
 देशांतगर्त आणि परराष्ट्रविषयक प्रश्नांसंदर्भात जनतेचा देशाच्या सर्वोच्च नेत्यावर किती विश्वास आहे यावर देखील सर्वेक्षण करण्यात आले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यामध्येही बाजी मारली आहे. देशांतर्गत प्रश्नांमध्ये ९४ टक्के लोकांनी आणि परराष्ट्रविषयक प्रश्नांमध्ये ९३ टक्के लोकांनी जिनपिंग यांच्या बाजूने कौल दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा क्रमांक लागला आहे.