शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

नरेंद्र मोदी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

By admin | Updated: January 15, 2017 00:10 IST

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असून, गेल्या आठवड्यात अशा प्रकारामुळे ते एका बैठकीतून निघूनच गेले, तर एका बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना

नवी दिल्ली : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असून, गेल्या आठवड्यात अशा प्रकारामुळे ते एका बैठकीतून निघूनच गेले, तर एका बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना नीट तयारी करून येत जा, असे सुनावले असे वृत्त आहे.अधिकाऱ्यांनी केलेल्या एका प्रेझेंटेशनबाबत पंतप्रधानांनी एका बैठकीत असमाधान व्यक्त केले आणि त्यांना नीट काम करा, पुन्हा प्रेझेंटेशन तयार करा, अशा स्पष्ट सूचनाच केल्या. गेल्या आठवड्यातही अधिकाऱ्यांनी केलेले प्रेझेंटेशन नीट नसल्याने मोदी यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे, तर ते बैठकीतून मध्येच निघून गेले होते. वास्तविक बैठकांमध्ये ते सर्व अधिकाऱ्यांचे म्हणणे बारकाईने ऐकून घेतात, त्यांनी तयार केलेली प्रेझेंटेशन नीट पाहतात आणि त्यावर बारीकसारीक प्रश्नही विचारतात. असे असताना, त्यांनी बैठकीतून निघून जाणे, ही असामान्य बाब मानली जात आहे. प्रेझेंटेशन मध्यावर सोडून निघताना, अशा पद्धतीचा निष्काळजीपणा यापुढे सहन केला जाणार नाही, असे संकेतच पंतप्रधान मोदींनी दिले. आपल्या कार्यालयातील कामावर आणि एकूणच गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हे प्रेझेंटेशन हे कृषी आणि संबंधित क्षेत्रातील अधिकारी सादर करत होते. ते पाहत असतानाच, त्यात काहीच नवे नाही, कोणतीही नवी कल्पना त्यात मांडण्यात आलेली नाही, असे त्यांच्या ध्यानात आले आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच अधिकाऱ्यांना ऐकवले. (लोकमत न्यूज नेटवर्क)तयारी करून येत जातुम्ही पूर्ण प्रयत्न केलेले नाहीत, असे हे प्रेझेंटेशन पाहताना जाणवत आहे. जा आणि मेहनत करून पुन्हा नव्याने प्रेझेंटेशन सादर करा, असा शब्दांत मोदींनी अधिकाऱ्यांचे कान टोचले. याआधी आरोग्य, स्वच्छता व नागरी विकास मंत्रालयातील अधिकारी प्रेझेंटेशन करीत असतानाही मोदी निघून गेले होते, असे सांगण्यात आले.