शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी हे हेरगिरी करणारे ‘बिग बॉस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 06:06 IST

डेटा शेअर करण्यावरून वाद रंगत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी हे हेरगिरी करणारे बिग बॉस आहेत

शीलेश शर्मा नवी दिल्ली : डेटा शेअर करण्यावरून वाद रंगत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी हे हेरगिरी करणारे बिग बॉस आहेत, अशा शब्दांत हल्लाबोल केला. त्यानंतर, काँग्रेस आपल्या अ‍ॅपवरील लोकांची माहिती सिंगापूरला देत असल्याचा आरोप होताच काँग्रेसने प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप हटविले.राहुल म्हणाले की, पंतप्रधानांच्या अधिकृत अ‍ॅपवरून युजर्सच्या सहमतीशिवाय डेटा शेअर करण्यात येत आहे. ‘नमो’ अ‍ॅप युजर्सच्या आॅडिओ, व्हिडीओची माहिती घेत आहे. जीपीएसद्वारो पत्ता, ठिकाणही जाणून घेत आहे. त्यांनी १३ लाख एनसीसी विद्यार्थ्यांना अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले असून, मोदी पदाचा दुरुपयोग करत आहेत. पंतप्रधान भारतीयांशी संवाद करू इच्छितात, याबाबत काहीच हरकत नाही, पण त्यासाठी अधिकृत पीएमओ अ‍ॅपचा उपयोग का? ही आकडेवारी भारताची आहे.इराणी यांचा पलटवारकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी पलटवार करताना म्हणाल्या की, राहुलजे सांगतात, त्याच्याविरुद्ध त्यांची टीम काम करत आहे. ‘नमो’ अ‍ॅप डिलीट करण्याऐवजी काँग्रेसने स्वत:चे अ‍ॅपच डिलीट केले. छोटा भीमही जाणतो की, अ‍ॅपवर सामान्य स्वरूपात मागण्यात आलेल्या परवानगीचा अर्थ हेरगिरी होत नाही. भाजपाच्या आयटी विभागाचे अमित मालवीय म्हणाले की, काँग्रेसच्या अ‍ॅपचा डेटा सिंगापूरमध्ये शेअर केला जात आहे.दोघांचे अ‍ॅप असुरक्षित‘नमो’ अ‍ॅप यूजर्सच्या संमतीविना त्यांची माहिती अमेरिकन कंपनीला देत असल्याचा दावा फ्रेंच हॅकर एलियट एल्डरसन यांनी केला आहे. काँग्रेसच्या अ‍ॅपवरील माहिती सुरक्षित नाही, असे म्हटले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी