शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-दिल्ली-अमृतसर रोज विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 04:12 IST

खा. हेमंत पाटील, प्रतापराव चिखलीकर यांना केंद्राचे आश्वासन

नवी दिल्ली : शीख धर्मियांसाठी अमृतसर पाठोपाठ नांदेड शहर महत्त्वाचे आहे. नांदेडहून दिल्ली-अमृतसर विमानसेवा नियमित सुरु करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आठवड्यातून तीन दिवस असणारी ही विमानसेवा लवकरच दररोज उपलब्ध होईल, असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय गृहनिर्माण, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी दिले.हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी ही मागणी रेटून धरली होती. नुकतीच त्यांनी पुरी यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन सादर केले होते. डॉ.प्रीतम मुंडे, डॉ.भारती पवार तसेच धैर्यशील माने यावेळी उपस्थित होते.

नांदेड-पुणे-मुंबई व मुंबई-पुणे-नांदेड विमानसेवा सुरु करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मुंबई तसेच हैदराबाद विमानतळावर विमानांची वर्दळ जास्त असल्याने विमान पार्किंगसाठी जास्तीचे दर मोजावे लागतात. दर कमी करण्यासाठी नांदेड विमानतळावर पार्किंग हब उभारण्यात यावे. नांदेड विमानतळ त्यामुळे इतर शहरांशी जोडले जाईल, अशी मागणी ही खासदारांच्या शिष्ठमंडळाने केली आहे. यासंबंधी सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन पूरी यांनी दिले.

नांदेड शहराला विशेष धार्मिक महत्व आहे. गुरु गोविंद सिंग यांच्या चरस्पशार्ने ही भूमी पावन, पवित्र झाली आहे. शीख धमिंर्यांच्या पाच तख्तापैकी एक इथे आहे. स्वाभाविक शहरासोबत शीख बांधवांच्या भावना जुळल्या आहेत. शीखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंह यांनी त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ इथे व्यथित केला. ह्यतख्त सचखंड श्री हुजूर अबचल नगर साहिबह्ण च्या दर्शनासाठी लाखो भाविक दररोज शहरात दाखल होतात.

नांदेडवरुन दिल्ली-अमृतसरसाठी आठवड्यातून तीन दिवस असणारी विमानसेवा दररोज सुरु करण्याची मागणी त्यामुळे करण्यात येत होती. मागणीला तत्काळ मंजूरी देण्यात आली आहे. सरकारच्या सकारात्मक आश्वासनामुळे लाखो भाविकांना दिलासा मिळणार आहे.नांदेड-दिल्ली-अमृतसर विमानसेवा नियमित करण्याची मागणी गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. मागणीवर आता केंद्र सरकारने सकारात्मकता दर्र्शवली आहे. थेट अमृतसरसोबत नांदेड आता नियमित पणे जोडले जाईल, त्यामुळे शीख बांधवांना त्यांच्या दक्षिण काशीचे दर्शन घेता येईल. नांदेड तसेच दिल्लीच्या प्रवाशांसाठी ही विमानसेवेचा लाभ होईल.नांदेड, लातूर, हिंगोलीच्या खासदारांच्या संयुक्त मागणीला यश मिळाले आहे.-प्रतापराव चिखलीकर, खासदार, नांदेड