शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर नमो नमो, जगभरात मोदी अव्वल

By admin | Updated: May 28, 2017 07:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुकवर चार कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्ससह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुकवर चार कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्ससह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले असून ही बाब नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमधून समोर आली आहे.याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते ठरले आहेत. या चार कोटी फॉलोअर्समध्ये मोदी यांच्या पेजला तीन कोटी, तर पंतप्रधान कार्यालयाच्या पेजला एक कोटी फॉलोअर्सचा समावेश आहे. मोदी यांनी मे2014 मध्ये पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली त्यावेळी त्यांच्या पेजला केवळ 40 लाख फॉलोअर्स होते. हा आकडा तीन वर्षांमध्ये चार कोटींवर जाऊन पोहोचला आहे.मोदी यांनी फॉलोअर्सच्या बाबतीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले आहे. सोशल मिडियावर मोदी यांच्या डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत या योजना लोकप्रिय ठरल्या आहेत. सार्वजनिक प्रशासनामध्ये सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्याची ही नवीन पद्धत आहे, अशा प्रतिक्रिया फेसबुकचे भारतातील संचालक अंखी दास यांनी सांगितले आहे.मोदी यांच्यानंतर भारतात सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, जनरल व्ही के सिंह, पियुष गोयल आणि अरुण जेटली यांचा समावेश आहे. केंद्रीय महिती व प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, रेल्वे मंत्रालय यांच्याकडून फेसबुकद्वारे लोकांशी संवाद साधून, फेसबुक लाईव्हच्या सेवेचा वापर करून सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्यास प्रतिसादही चांगला मिळत आहे. दास यांच्या सांगण्यानुसार, फेसबुकद्वारे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत जवळपास सहा हजार सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.