शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तीनही पॅनलने केली उमेदवारांच्या नावांची घोषणा

By admin | Updated: July 10, 2015 00:28 IST

शिवसेनेत फाटाफूट, भाजपा एकाकी

शिवसेनेत फाटाफूट, भाजपा एकाकीनाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तीनही पॅनलच्या नेत्यांनी त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांची घोषणा (दि.९) केली. या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे पॅनल होण्याची चिन्हे असतानाच शिवसेनेत फाटाफूट होऊन शेतकरी विकास पॅनलकडे माजीमंत्री बबनराव घोलप व उपजिल्हाप्रमुख जगन आगळे वगळता अन्य पदाधिकार्‍यांनी माजी खासदार देवीदास पिंगळेंच्या आपलं पॅनलशी घरोबा केल्याचे चित्र आहे, तर भाजपाचे आमदार अपूर्व हिरे यांनी माघार घेतल्याने व दोघा उमेदवारांनी शेतकरी विकासची वाट पकडल्याने भाजपाही एकाकी पडल्याचे चित्र आहे.दुपारी देवीदास पिंगळे यांनी त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांची घोषणा केली. त्यात सोसायटी गटातून देवीदास पिंगळे, तुकाराम पेखळे, शंकर धनवटे, आत्माराम दाते, युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, संतोष डोमे, इतर मागास प्रवर्गातून दिलीप थेटे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून विश्वास नागरे, महिला राखीव गटातून ताराबाई माळेकर व विमलताई जुंद्रे, ग्रामपंचायत गटातून संजय तुंगार, रवींद्र भोये, भाऊसाहेब खांडबहाले, श्याम भास्कर गावित यांना, तर व्यापारी-आडते गटातून मोहनराज मोराडे व जगदीश अपसुंदे यांचा समावेश आहे. यावेळी देवीदास पिंगळे यांनी राज्य शिखर बँकेच्या वतीने विकण्यात आलेल्या गाळ्यांपोटी लिलावातून जमा झालेली ७४ कोटींची रक्कम शिखर बॅँकेत भरल्याने आजमितीस बाजार समिती कर्जमुक्त असल्याचे सांगितले. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, पेठ शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर गावित, शंकर धनवटे, हिरामण खोसकर, दिलीप थेटे, विनायक माळेकर, तुकाराम पेखले, चंद्रकांत निकम यांच्यासह पॅनलमधील बहुसंख्य उमेदवार हजर होते, तर दुपारी शेतकरी विकास पॅनलने जिल्हाधिकारी आवारातच पॅनलच्या उमेदवारांची घोषणा केली. त्यात सर्वसाधारण गटातून महापालिका स्थायी समिती साभपती शिवाजी चंुबळे, मुरलीधर पाटी,. संपतराव सकाळे, रघुनाथ फडोळ, नामदेव आगळे, सुरेश निमसे, अशोक ठुबे, महिला राखीव गटातून-चंद्रकला मेढे व सुवर्णा बोडके, इतर मागास प्रवर्ग-सुनील खोडे, भटक्या जमाती गटातून अंबादास घुगे, ग्रामपंचायत गटातून राजाराम फडोळ, रवींद्र राऊतमाळे, रमेश गालट, रूपाली जाधव, व्यापारी व आडते गटातून संदीप पाटील व ताराचंद दलवाणी यांचा समावेश आहे. यावेळी शिवाजी चुंबळे, मुरलीधर पाटील, संपतराव सकाळे, दामोदर मानकर यांच्यासह पॅनलचे बहुसंख्य उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)