शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विमानात अचानक वाजले राष्ट्रगीत!

By admin | Updated: April 24, 2017 00:40 IST

गेल्या आठवड्यात, १८ एप्रिल रोजी, तिरुपतीहून आलेले स्पाइस-जेट कंपनीचे विमान हैदराबाद विमानतळावर उतरण्याच्या बेतात

इंदूर : गेल्या आठवड्यात, १८ एप्रिल रोजी, तिरुपतीहून आलेले स्पाइस-जेट कंपनीचे विमान हैदराबाद विमानतळावर उतरण्याच्या बेतात असताना, विमानातील ध्वनिक्षेपण यंत्रणेवर अचानक राष्ट्रगीत लावण्यात आल्याने प्रवासी अचंबित झाले.या विमानाने प्रवास केलेल्या पुनीत तिवारी या प्रवाशाने या संदर्भात रीतसर तक्रार नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विमान उतरण्याच्या तयारीत असल्याने सर्व प्रवाशांना खुर्च्या सरळ ठेवून सुरक्षा पट्टे बांधण्यास सांगण्यात आले होते. वैमानिकाने दिलेल्या सुरक्षा निर्देशांचे पालन करायचे की, ते झुगारून व बांधलेला पट्टा सोडून राष्ट्रगीतासाठी उभे राहायचे, अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या प्रवाशांची मोठी पंचाईत झाली.नेमके काय घडते आहे हे कळायच्या आत, एका विमान कर्मचाऱ्याने ध्वनिक्षेपण यंत्रणा चटकन बंद केली, पण थोड्याच वेळात ती पुन्हा सुरू होऊन राष्ट्रगीत वाजू लागले, असे तिवारी यांची तक्रारीत म्हटले आहे.बँक मॅनेजर असलेल्या तिवारी यांनी या घटनेचा व्हिडीओही काढला. अशा प्रकारे राष्ट्रगीत विमानात वाजविण्याच्या पोरखेळाने आपले मन व्यथित झाले, असेही त्यांनी नमूद केले. पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीसह प्रवास करणाऱ्या तिवारी यांनी विमान कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, पण विमानाच्या आॅडिओ सीस्टिममध्ये राष्ट्रगीत आधीपासूनच भरलेले असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. अशी घटना घडल्याचे स्पाइस-जेटच्या प्रवक्त्याने मान्य केले व यामुळे प्रवाशांची काही गैरसोय झाली असल्यास, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)